शिरोली (पुलाची), हातकणंगले येथील मा.श्री. मिलिंद धोंड यांनी श्री स्वामी जगदंब कार्यसिद्धी मंदीर शिरोली येथे उभे केले असून या मंदिरामध्ये श्री महागणपती, श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली स्वरुपी अष्टादशभुजा राजराजेश्वरी आदिशक्ती, श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज,श्री हनुमान,श्री भैरवनाथ यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली व कलशारोहण सोहळा पार पडला. यावेळी मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर (संचालक -गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी या मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. तसेच येथे चालू असलेल्या कुंकुमार्चन व सहस्तरचंडी पाठ या ठिकाणी भेट दिली. यावेळी मोठ्या संख्यने महिला उपस्थित होत्या. यावेळी प्रसादाचे वाटप केले.
शिवसेना पदाधिकारी विजय भोसले, उद्योगपती युवराज रानिंगा, उद्योगपती विजय घाडगे साहेब,मनोज इंगवले,दीपक पाटील तसेच उपस्थित महाराज व भक्त गण....
_____________________



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या