यांच्या वतीने, उपकार्यकारी अभियंतासो सा . बां .विभाग हातकणंगले जि. कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले
निवेदन देणेस कारण की .
सोमवार दि .२८ / ८ / २०२३ रोजी हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया समोर निदर्शनात्मक " बोंब मारो " आंदोलन करत असले म्हंटले आहे या बाबत सविस्तर माहिती अशी की
रूकडी .ता. हातकणंगले येथील साहित्यरत्न लोक शाहीर आण्णा भाऊ साठे चौकात गतिरोधका अभावी वारंवार होणाऱ्या अपघातामुळे निरापराध लोकांचे शारिरीक . मानसिक .व आर्थिक नुकसान होवू लागले असुन जलदगतीच्या वहातुकी मुळे शालेय विद्यार्थी . वृध्द .व लहान मुलांच्या जिवितास धोका निर्मान झाला आहे . नागरिकांच्या जिवितास कोणताही धोका निर्मान होवू नये व कायदा सुव्यवस्थेचा कोणताही गंभीर प्रश्न निर्मान होवू नये म्हणुन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे चौकात गतिरोधक करणेत यावा यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम, विभागाला वारंवार सुचना करून .. लेखी निवेदन देवूनही मानवी जिविताशी निगडीत असणाऱ्या गंभीर प्रश्नाची संबधित विभागाने गांभीर्याने दखल घेतलेली नाही .संघटनेने आसेही निवेदनात आधिकार्यावर आरोप केले आहे की, आर्थिक निकषावर व टक्केवारीवर कामे करणाऱ्या या निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना लोकांच्या जिविताचे काही घेणे देणे नसल्याचे स्पष्ट दिसत आहे .केवळ जुजबी कारणे देवून संबधित प्रशासन वेळ काढूपणा करत आहे .
रुकडी या ठिकाणी आण्णा भाऊ साठे चौकात तात्काळ गतिरोधक करून होणारे नुकसान टाळावे व गेंड्याच्या कातडीच्या या उदासिन प्रशासनाला जाग यावी या न्याय मागणीसाठी सोमवार दि .२८ / ८ / २o२३ रोजी हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया समोर " निदर्शनात्मक बोंम मारो आदोलन करणेत येणार आहे असे दिलेल्या पत्रात म्हटले. आहे . पोलीस स्टेशन हातकणंगले यांना हि
निवेदन देत असताना उपस्थित भारतीय दलित महासंघ हातकणंगले तालुकाध्यक्ष माननीय श्री राहुल राजू घाटगे, अंकुश रघुनाथ कांबळे, बाबासाहेब बनगे, सुरेश बाळू लोखंडे, राजू लोखंडे, राहुल चंद्रकांत आवळे, अक्षय राजू घाटगे, युवराज विलास लोखंडे, विकास कांबळे उपस्थित होते
_____________________
_____________________


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या