इचलकरंजी :आमदार प्रकाश आवाडे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यातून राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन 2023-24 अंतर्गत इचलकरंजी मध्ये गेले अनेक वर्ष सातत्य पूर्ण धेहवेडी चिकाटी ने काम करत आसणारी "करुणा बहुउद्देशीय सेवा संचलित नालंदा प्रशासकीय सेवा अॅकॅडमी ” या अॅकॅडमीस गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज व सुविधांनीयुक्त अभ्यासिका इमारत ,वसतिगृह उभारणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
इचलकरंजी येथील करूणा बहुउद्देशीय सेवा संचलित नालंदा प्रशासकीय सेवा अॅकॅडमी या नावाने अभ्यासिका सुरू असून या अभ्यासिकेत गरीब व हुशार विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या अभ्यासिकेतील अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर यशाचे शिखर गाठले आहे . सध्या ही संस्था भाड्याच्या जागेत सुरू असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे सर्व सोयींनीयुक्त अशी अभ्यासिका बांधण्याची गरज आहे. या अभ्यासिकेसाठी अत्याधुनिक लायब्ररी, प्रत्येक टेबलवर कॉम्प्युटर, विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे अशा सुसज्ज इमारतीची आवश्यकता आहे.हे लक्षात घेउनं मा आवाडे यांनी पठवपुरावा करून ,सदरचा निधी उपलब्ध करण्यास सहकार्य केले.


Post a Comment
0 Comments