दक्षिण कोरियात आशियाई अंडर-२० चॅम्पिअनशिप स्पर्धेत रिया पाटील हीचे यश .आमदार ऋतुराज पाटील यांनी केला सत्कार..
कोल्हापूर :
दक्षिण कोरियातील इंचियोन येथे झालेल्या आशियाई अंडर-२० चॅम्पिअनशिप स्पर्धेत कसबा बावडा येथील रिया नितीन पाटील हिने ४ बाय ४०० मीटर रिले संघात ३:४०:५० सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या कामगिरीबद्दल श्री राम सोसायटी येथे तिचा आमदार ऋतुराज संजय पाटील हस्ते सत्कार करण्यात आला.
जागतिक स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या रिया पाटील हिचा सर्व बावडेकरांना अभिमान आहे. कोल्हापूर हे खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणारे शहर आहे. रियाच्या यशामुळे खेळात कारकीर्द घडविणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल.
याप्रसंगी श्री राम सोसायटीचे सभापती हिंदुराव ठोंबरे, उपसभापती सविता रणदिवे, माजी नगरसेवक मोहन सालपे यांच्यासह नितीन पाटील, किशोर पाटील, सचिन पाटील, श्री राम सोसायटीचे सर्व संचालक व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments