Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या उचगांव गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड मधील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापुर्वी साफ करावेत - करवीर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)


        पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या उचगांव गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड मधील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापुर्वी साफ करावेत - करवीर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)

    गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजार पेठ असून गांधीनगर मेन रोड हा उचगांव, गडमुडशिंगी, वळीवडे, चिंचवाड, सह गांधीनगर अशा पाच गावांच्या हद्दीत येतो मेनरोड पासून अगदी जवळ पंचगंगा नदी असून गांधीनगर मेनरोडला दुतर्फा मोठ मोठे व्यापारी संकुल असुन त्या मेनरोडवरील सर्व गटारी प्लास्टीक कचरा व इतर कचऱ्याने तुडुंब भरलेल्या आहेत. तसेच गडमुडशिंगीहून आलेला ओढा त्याच्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे त्याला गटारीचे स्वरूप आले असून तोही प्लास्टीक कचऱ्यासह इतर कचऱ्याने तुडुंब भरलेला आहे पहिल्या पावसामध्ये या सर्व गटारी नाले व ओढ्यातील कचरा थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळतो त्यामुळे पंचगंगा नदी प्रदुषीत होते व गटारी, ओढा तुंबल्याने गांधीनगर मेनरोडवर व तळमजल्यामध्ये असणाऱ्या दुकानामध्ये पाणी जावुन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. तसेच गांधीनगर मुख्य रस्ताही नवीन झाला असून गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचल्याने १० कोटी रूपये खर्च करून केलेला नवीन रस्ताही खराब होण्याची शक्यता आहे. व उंचगावातील ओढा ही कचऱ्याने तुडुंब भरला असून तो ही साफ करण्याच्या सुचना द्याव्यात. तरी पाणी निचरा होण्यासाठी पावसाळ्यापुर्वी या पाचही गावातील ओढे, नाले, गटारी साफ करण्याच्या सुचना संबंधीत ग्रामपंचायतीला देण्यात याव्यात व पंचगंगा नदी प्रदुषण होण्यापासून रोखावे.

    या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने मा.विजय वसंत यादव,गटविकास अधिकारीसो, करवीर पंचायत समिती, कोल्हापूर यांना देण्यात आले.

    यावेळी गटविकास अधिकारी  मा.विजय यादव यांनी सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून  पावसाळ्यापूर्वी ओढे, नाले व गटारी लवकरात लवकर साफ करून घेण्यासाठी आदेश देऊ जेणे करून पंचगंगा नदी प्रदूषित होणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

    यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, हिंदुत्ववादी शरद माळी, विभागप्रमुख दिपक पोपटाणी (फ्रेमवाला), फेरीवाला संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास जाधव,ओबीसी सेलचे सचिन माळी, किशोर कामरा, युवासेनेचे योगेश लोहार, सुनील पारपाणी, जितू चावला,गांधीनगर फे.सं. नागेश शिरवटे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments