Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन RPI चे युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे व तिसंगी मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्या सोनाली पाटील यांच्या हस्ते संपन्न......



कसबा सांगाव येथील "आधार" व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन RPI चे युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे व तिसंगी मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्या सोनाली पाटील यांच्या हस्ते संपन्न.....
यावेळी बोलत असताना अविनाश शिंदे म्हणाले आजच्या समाजातील युवक व्यसनाधींच्या जास्त आहारी जाऊन स्वतःचे जीवन उध्वस्त करीत आहे. त्याला आळा घालण्यासाठी कसबा सांगायचे सुपुत्र जिवन व गंगाधर उर्फ पप्पू या दोन्ही भावांनी कसबा सांगाव येथे आधार व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे व आभार मानावे तितके थोडेच आहे. मान्यवरांचे स्वागत आधार व्यसनमुक्ती केंद्राचे डायरेक्टर जीवन सांगावकर यांनी केले. या उद्घाटन प्रसंगी मा.जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील बापू, आनंदराव जाधव विकास सेवा सोसायटीचे मा. चेअरमन राजेंद्र माने सर, गगनबावडा मा.उपसभापती पांडुरंग भोसले, मा.सरपंच रणजीत कांबळे, ऍड. बाबासो मगदूम,शेतकरी संघटनेचे नेते अविनाश मगदूम यांनी दोघांचे कौतुक करून देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक प्रधान भोजे, ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे, प्रथमेश सहकारी पतसंस्था संचालक महेश पाटील, अमोल माळी मनोज कडोले, यांच्यासह सर्व क्षेत्रात काम करणारे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. आभार गंगाधर सांगावकर यांनी मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या