Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

गांधीनगरातील ऑनलाइन बेटिंग, गांजा-दारू विक्री व गुन्हेगारीवर तात्काळ कारवाई करा; अन्यथा तीव्र आंदोलन


 गांधीनगरातील ऑनलाइन बेटिंग, गांजा-दारू विक्री व गुन्हेगारीवर तात्काळ कारवाई करा; अन्यथा तीव्र आंदोलन – अविनाश शिंदे

गांधीनगर, दि. २२ : गांधीनगर परिसरात वाढत चाललेली ऑनलाइन बेटिंग, मटका, गावठी दारू विक्री, गुटखा विक्री, चरस-गांजा तस्करी तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व बेकायदेशीर प्रकारांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) युवक आघाडीच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिला आहे.

नुकत्याच गांधीनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षकांचे स्वागत करताना अविनाश शिंदे यांनी परिसरातील गंभीर समस्या मांडल्या. त्यांनी सांगितले की, गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी व्यापारपेठ असून येथे मोठ्या प्रमाणात युवक, महिला व नागरिक रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने येत असतात. मात्र वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

ऑनलाइन बेटिंगच्या व्यसनामुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे *अमर कांबळे, गजेंद्र कांबळे, अविभाऊ कांबळे ,योगेश आजाटे ,नितीन कांबळे, मनोहर कांबळे, किरण कांबळे, विकास कांबळे, रजत कांबळे, संकेत कोठावळे, तुषार सावंत, रवी कांबळे ,चेतन कांबळे विशाल कांबळे, यांच्या सह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या