सापळा रचुन यशस्वी कारवाई दोन
इसमांकडुन एकुण ४,५९,५७५/- रुपये किंमतीची दारु तसेच टेंपो व चारचाकी अशा दोन वाहनांसह एकुण- १३,६९,५७५/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत. मा. पोलीस अधीक्षक साो यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे श्री. रविंद्र कळमकर पोलीस निरीक्षक करवीर पोलीस ठाणे यांनी करवीर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाणेहद्दीत पेट्रोलिंग करुन अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत मुखशिल आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक
०१/०६/२०२६ रोजी गुन्हे शोध पथकातील अंमलदार विजय पाटील व सोमराज पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, कळंबा गावचे हद्दीत कोल्हापूर ते गारगोटी जाणारे रोडवरुन निस्सान कंपनीची टेरॅन्टो चारचाकी गाडी क्र. एम.एच.१० बी.आर.९७९७ या गाडीतुन विदेशी दारुची बेकायदेशीर वाहतुक होणार आहे मिळाले बातमी प्रमाणे कळंबा गावचे हददीत सापळा लावला असता कळंबा नाक्याच्या पुढील
बाजुस हॉटेल रानवाराच्या समोर, कळंबा, ता. करवीर येथे निस्सान कंपनीची टेरॅन्टो चारचाकी गाडी क्र. एम.एच.१० बी.आर.९७९७ मधुन ३१,७००/-रुपये किंमतीची विदेशी दारु व चारचाकी गाडी असा एकुण ७,३१,७००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी नामे शहाजी साताप्पा बरगे व. व. ४८, रा. अर्जुनवाड, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर
याचेकडुन जप्त केला आहे.तसेच करवीर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील सुभाष सरवडेकर यांना त्यांचे गोपनीय
बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, कोल्हापूर ते राधानगरी जाणारे रोडवरुन टेंपो क्रमांक एम.एच.११ सी.एच ४१५० यागाडीतुन देशी विदेशी दारुची वाहतुक होणार आहे मिळाले बातमी प्रमाणे नवीन वाशीनाका येथे सापळा लावला असता श्री लॉन च्या पुढील बाजुस, सॉलिटरी सहकारी गृह निर्माण संस्थेच्या समोर, नवीन वाशी नाका,कोल्हापूर येथे टाटा कंपनीचा जीप एक्सेल टेंपो क्रमांक एम.एच.११ सी.एच. ४१५० मधुन आरोपी नामे मुबीन अजीज शेख व.व. २६, रा.शिवाजीनगर, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर सध्या रा. बुध्याळकरनगर कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर हा ४, २७,८७५/-रुपये किंमतीच्या देशी विदेशी दारुची वाहतूक करत असताना टेंपोसह एकुण ६,३७,८७५/-रुपये किंमतीच्या मुद्देमालासह मिळून आलेने सदर दोन्ही मिळून आलेल्या इसमांविरुद्ध करवीर पोलीस ठाणेस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदर दोन्ही कारवाई मध्ये एकुण ४,५९,५७५/- रुपये किंमतीची देशी विदेशी दारु व दोन्ही वाहनांसह एकुण १३,६९,५७५/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरचा माल हा गोल्डन वाईन्स, हॉकी स्टेडिअम व मेरवाडे वाईन्स, सायबर चौक, कोल्हापूर या ठिकाणांहुन घेतलेचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सदर वाईन्स मालक यांना देखील सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असुन त्यांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेलीआहे. सदरबाबत मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्यांचा तपास सुरु आहे
सदरची कारवाई ही कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल साो, अपर पोलीस
अधीक्षक, अण्णासाहेब जाधव सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी, मा. सुजितकुमार क्षीरसागर सोोयांचे मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोसई नाथा गळवे,सुभाष सरवडेकर, रणजीत पाटील, विजय तळसकर, विजय पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे,अमोल चव्हाण, सोमराज पाटील, श्रीधर जाधव यांनी केलेली आहे.
-----–-----–-------------------------------------------



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या