Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

राजाशिवाजी चित्रपटामधील ‘फूल पारिजात’ गाणे झाले रिलीज! अजय- अतुल यांच्या सुरातून सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!*


कोल्हापूर-

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील ‘फूल पारिजात’ हे गीत आज झाले रिलीज. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या नात्यातील प्रेम, आदर आणि समर्पणाची भावना या गीतातून अत्यंत सुंदरपणे उलगडली आहे. महाराजांची केवळ पराक्रमी योद्धा म्हणून नव्हे, तर संवेदनशील , भावनिक आणि प्रेमळ स्वभावाची बाजू या गीतातून जाणवते.

अजय-अतुल यांच्या सुरेल संगीताने सजलेले हे गीत शांत,भावपूर्ण आणि अभिजात शैलीत साकारले गेले आहे. श्रेया घोषाल यांनी हे गाण गायली आहे. गीतातील प्रत्येक सूर सईबाईंच्या मनातील प्रेम, समाधान आणि भक्तीभाव अधिक प्रभावीपणे व्यक्त करतो. विशेष म्हणजे, संगीत आणि शब्द यांचा समतोल राखत हे गीत कथानकाच्या भावनिक गाभ्याला अधिक ताकद देते.

‘फूल पारिजात’ या शीर्षकाप्रमाणेच गीतात पारिजाताच्या फुलाचे सुंदर रूपक वापरण्यात आले आहे. सईबाईंच्या आयुष्यात शिवाजी महाराजांचे स्थान हे एका दैवी आशीर्वादासारखे असल्याची भावना या गीतातून प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे हे गीत केवळ प्रेमगीत न राहता, एका पवित्र आणि आत्मीय नात्याची भावपूर्ण अभिव्यक्ती ठरते.

युद्ध, स्वराज्य आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘फूल पारिजात’ हे गीत चित्रपटात एक सुंदर भावनिक क्षण निर्माण करते. सईबाईंच्या नजरेतून उलगडणारे महाराजांचे कोमल रूप प्रेक्षकांना अधिक जवळून अनुभवायला मिळते.

जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख निर्मित, रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ मराठी आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला असून. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

-------------+------------------------------------------

Post a Comment

0 Comments