जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील जन औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या वतीने शेंडा पार्क येथे कार्यक्रम संपन्न झाला. जागतिक आरोग्य संघटनेने 2025 सालाकरिता " *आरोग्यदायी सुरुवात आणि आशादायी भविष्य "* असे घोषवाक्य जाहीर केलेले आहे. या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जन औषध वैद्यक शास्त्राच्या वतीने वैद्यकीय विद्यार्थी व अध्यापकांकरिता चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये डॉ मंजुनाथ आवाड खान , सहाय्यक प्राध्यापक , बालरोग शास्त्र यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार नवजात शिशु , अर्भक तसेच बाल मृत्यू दर नियंत्रित करण्याकरता असलेली आव्हाने व त्याला सामोरे कसे जावे याबाबत , त्याचप्रमाणे डॉ अनुषा , वरिष्ठ निवासी , स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र यांनी माता मृत्यू दर कमी करण्या करिता वैद्यकीय क्षेत्रापुढे असलेली आव्हाने व आवश्यक उपाय याबाबत मार्गदर्शन केले . तसेच डॉ.निपुल खानांदे , सहाय्यक प्राध्यापक जनौषध वैद्यकशास्त्र यांनी माता व बालकांच्या आरोग्याबाबत रोग विज्ञानाची सध्यस्थिती याबाबत ऊहापोह केला. या दरम्यान जन औषध वैद्यकशास्त्र विभागामार्फत विभागामार्फत मार्फत डॉक्टर नर्सेस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्फत होत असलेल्या क्षेत्रभेटीच्या दरम्यान प्रभावीपणे आरोग्य शिक्षण होण्याकरिता विभाग प्रमुख डॉ सुदेश गंधम यांच्या कल्पनेतून निर्मित केलेली माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. यामध्ये नवजात अर्भक तसेच मुलांमधील आजार , लसीकरण , स्तनपान तसेच प्रसुती दरम्यान घेण्याची काळजी , प्रसूतीपूर्व तपासण्या, प्रसूती पश्चात सेवा याबद्दल चित्रीत माहिती सादर करण्यात आलेली आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या घोषवाक्य बाबतीत रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा तसेच भित्तिपत्रक सादरीकरण स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. त्यातील विजेत्यांचे सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करून सन्मान करण्यात आला. डॉ सुरेश यांनी प्रास्ताविक केले व विभाग प्रमुख डॉ. सुदेश गंधम यांनी स्वागत केले. डॉ सत्यवान मोरे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे बालरोग विभाग प्रमुख डॉ . संगीता कुंभोजकर , डॉ. नामे , डॉ. गायत्री कुलकर्णी , डॉ . शुभलक्ष्मी कोटणीस , डॉ. अनुराग गुप्ता , डॉ . राजश्री उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. शितू जेलखानी व डॉ सोनाली सोहनी यांनी केले . तसेच सूत्रसंचालन डॉ.सुरेश यांनी केले . आभार प्रदर्शन डॉ. गोकुल यांनी केले
" *आरोग्यदायी सुरुवात आणि आशादायी भविष्य "* हे वाक्य जागतिक आरोग्य दिन निमित्त घोषीत.
April 09, 2025
0
Tags

Post a Comment
0 Comments