Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

दोन तासातच प्रवेशाचे शतक...कोणाचे ते नक्की पहा.



*मनपा. टेंबलाईवाडी विद्यालय शाळा क्रमांक 33 कोल्हापूर*

कोल्हापूर 30 मार्च 25

✧════•❁❀❁•═════✧

✌🏻 *यावर्षी पुन्हा..100 पार..*

💥 *कोल्हापूर महानगरपालिकेचे टेंबलाईवाडी विद्यालय गुढीपाडव्याच्या पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल..*

👉🏻   *इयत्ता पहिलीसाठी 147 इतक्या विक्रमी अर्जांचे वितरण तर इयत्ता दुसरी ते सातवीसाठी 50 नवीन विद्यार्थ्यांची नावे नोंद.*

*🎊 नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे अंकलीपी देऊन स्वागत..*

*🥳 दोन तासातच प्रवेशाचे शतक....*


                See Video 

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालय शाळा क्रमांक 33 शाळेच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेला आज प्रारंभ करण्यात आला..

कोल्हापूर शहरातील स्कॉलरशिप मध्ये नावलौकिक मिळवलेल्या या शाळेचे इयत्ता पहिलीचे ॲडमिशन दरवर्षी गुढीपाडव्याच्या पहिल्याच दिवशी हाऊसफुल होते.

 *गुणवत्तेचे माहेरघर* हे ब्रीद वाक्य जपत इयत्ता पहिलीपासूनच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी ज्यादा वेळ देऊन करून घेण्यात येते. याचाच परिपाक म्हणून फक्त कोल्हापूर शहरातूनच नव्हे तर शहराच्या आसपासच्या गावांमधील शाळेमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी पालक आग्रही दिसत आहेत. आज शाळेत गुढीपाडव्यादिवशी प्रवेशासाठी पालकांनी रांगा लागल्या होत्या.

 सकाळी 9 वाजता शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. इयत्ता पहिलीसाठी 147 पालकांनी प्रवेश अर्ज स्वीकारला व इयत्ता दुसरी ते इयत्ता सातवीसाठी 50 विद्यार्थ्यांची नावे नोंद करण्यात आली . 

यावेळी 

✨ शाळेचे मुख्याध्यापक माननीय *श्री विलास पिंगळे सर* व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

*प्रवेश प्रक्रियेला प्राथमिक शिक्षण समिती प्रशासन अधिकारी मा. श्री. आर. व्ही. कांबळे साहेब, शैक्षणिक पर्यवेक्षक श्री. बाळासाहेब कांबळे, मान.श्री. विजय माळी , मान. सौ. उषा सरदेसाई, मान. श्री. चंद्रकांत कुंभार,  आदींचे मार्गदर्शन लाभले.*


   *कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती  प्रतिमेचे पूजन व शाळेच्या गुणवत्तेच्या गुढीचे पूजन* करून करण्यात आले.

यावेळी प्रास्ताविकामध्ये शाळेच्या *केंद्र मुख्याध्यापक श्री विलास शामराव पिंगळे सर यांनी पालकांनी शाळेवर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी शाळेतील शिक्षक घड्याळाकडे न पाहता काम करत असतात व विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम शाळेत राबवत असल्याचे सांगितले.*

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, शाळेतील सर्व शिक्षक सेवक, व पालक उपस्थित होते.

*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*

Post a Comment

0 Comments