Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू) यांनी भेट देऊन पाहणी केली

 

हातकणंगले तालुक्यातील काही गावात वादळी वारा व पाऊस झाल्याने काही गावात घरांचे नुकसान झाले आहे, ते पाहणी करण्यासाठी आमदार दलित  मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी हातकणंगले तहसीलदारां समवेत काही गावात पाहणी केली.

 वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव,नवे पारगाव, तळसंदे, नवे चावरे, किणी, भेंडवडे, निलेवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर आज हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू) यांनी भेट देऊन पाहणी केली व 

 हातकणंगलेचे तहसीलदार बेलेकर साहेब यांना तत्काळ पंचनामे करण्याबाबत सूचना केल्या व योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा अशी सूचना केली. तसेच नुकसान झालेल्या सर्व शेतकरी,ग्रामस्थ यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.

 यावेळी.. वारणा साखर कारखान्याचे संचालक शहाजी पाटील तात्या, भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास माने आप्पा, पोलीस पाटील इंद्रजीत पाटील,ग्रा. पं सदस्य उदय चाळके, संचालक हनुमान दूध कृष्णात पाटील डे. सरपंच मनोहर चव्हाण  यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते

_______________ ___________________



Post a Comment

0 Comments