शाहुपुरी पोलीस ठाणे जि. कोल्हापूर
अभिलेखावरील सराईत इसमावर मोठी कारवाई
दि. ०९/०३/२०२५
कोल्हापूर जिल्हयात गेल्या काही दिवसापासुन मालाविरुध्द व शरीराविरुध्दचे गुन्हे घडलेले होते. सदरचे गुन्हयामध्ये अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे निदर्शनास येताचा मा. पोलीस अधीक्षक सौ कोल्हापूर श्री महेंद्र पडीत यांनी शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांचेवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालनेच्या दृष्टीने शाहुपूरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री संतोष डोके यांनी शाहुपूरी पोलीस ठाणेकडील सराईत गुन्हेगारांचे अभिलेख पडताळणी सुरु केली. त्यामध्ये इसम नामे सौरभ काळु कोळी वय २२ रा. सदर कोरगावकर शाळे समोर सदर बझार कोल्हापूर हा गुन्हेगारी कारवायामध्ये सक्रीय असलेचे निदर्शनास आले. त्यामुळे पोनि श्री सतोष डोके यानी त्याच्या कारवायांना आळा घालनेसाठी एमपीडीए कायद्यातर्गत कारवाई करण्याची तयारी सुरु केली. त्याप्रमाणे श्री संतोष ठोके यांनी त्याचे अधिपत्याखालील पोलीस हवालदार संजय जाधव यांना नमुद इसमाविरुद्ध प्रतिबंधक स्थानबध्दतेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले.त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री संतोष डोके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय जाधव यांनी इसम नामे सौरभ काळु कोळी याचा स्थानबध्द प्रस्ताव तयार करुन तो मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री अजित टिके यांचेकडे पडताळणी करीता सादर केला. त्यांनी सदरचा प्रस्तावाकरीता मार्गदर्शन करून सदरचा प्रस्ताव अभिप्रायासह
मा. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सादर केला. मा. पोलीस अधीक्षक सी कोल्हापूर यांचे सुचनांप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी प्रस्तावाची छाननी करून सदरचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांचे मान्यतेने कारवाईकरीता मा. जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर श्री अमोल येडगे सो यांचेकडे सादर केला. सदर प्रस्तावाच्या
छाननीअंती मा. जिल्हादंडाधिकारी यांनी इसम नामे सौरभ काळु कोळी वय २२ रा.कोरगावकर शाळे समोर सदर बझार कोल्हापूर यास येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबध्दतेचे आदेश पारित केले. त्यानंतर सदरचा इसम हा कारवाई चुकविण्याचे उद्देशाने अस्तित्व लपवुन वावरत होता त्यामुळे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी त्याचेकडील पाहेकॉ श्री विलास किराकेकर, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील, विशाल चौगुले यांचे पथक कारवाईत सहभागी होते.

Post a Comment
0 Comments