Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

शिकारीसाठी पायवाटेत स्फोटक असे बॉंबगोळे ठेवल्याप्रकरणी केली दोघांना आटक.



आजरा :-वन्यजीव संपत्ती ही मौल्यवान असून तिचा नाश करण्यासाठी विकृत बुद्धीलोक अनर्थ करत आहे.वन्य जीव रक्षणासाठी केवळ शासनच प्रयत्न करून चालणार नाही तर सर्व जनतेच्या मनात   यायला हवे.असाच एक प्रकार आजरा येथे घडला.
 जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी पायवाटेत स्फोटक असे बॉंबगोळे ठेवल्याप्रकरणी कर्नाटकातील दोघांना अटक करण्यात आली असून चंदगड वन परिक्षेत्राने ही कारवाई केली. मंजुनाथ धरम रजपूत, वय २७ आणि जेमिनी मंजू रजपूत वय २२, दोघेही राहणार हक्कीपक्की कॅम्प, होसुडी सदाशिवपुरा, ता. जि. शिमोगा (कर्नाटक) अशी संशयीतांची नावे आहेत. सदर दोन्ही आरोपीना दिनांक १४.०२.२०२४ रोजी चंदगड येथून ताब्यात घेतले. मौ. शिरसंगी गांव हे परिक्षेत्र वनअधिकारी आजरा यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नियतक्षेत्र शिरसंगीमध्ये असून आरोपीवर वनरक्षक शिरसंगी यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम २ (१), ९, (१६), ३९(१), (३), ५० सह ५२, ५१ (१) अन्वये प्र.गु.रि.क्र. WL-०१/२०२५, दि. १४/०२/२०२५ चा वनगुन्हा नोंद केलेला आहे.

     संशयित दोघेजण चंदगड वनपरिक्षेत्रातील मौ. चंदगड जं. क. क्र. ३ मध्ये शिकारीच्या हेतूने बकऱ्याचे पोटातील चारट लावलेले स्फोटक गोळे ठिकठिकाणी पाय वाटेवर ठेवत असल्याचे आढळून आलेने वनरक्षक चंदगड यांनी प्र.गु. रि.क्र. WL -०१ /२०२५, दि.१०/०२ / २०२५ अन्वये वनगुन्हा नोंद करून त्यांना अटक केलेली होती. सदर गुन्ह्याच्या अधिकच्या तपासामध्ये वरील आरोपी यांनी प्राधिकृत अधिकारी तथा मा. सहाय्यक वनसंरक्षक (खा. कु.तो. व वन्यजीव ) कोल्हापूर यांचे समोर दिलेल्या जबाबामध्ये मौ. शिरसंगी, ता.आजरा या गावच्या गावाबाहेरील माळावर मुक्कामासाठी थांबून मौ. शिरसंगी परिसरामध्ये विविध ठिकाणी जाऊन वन्यप्राणी शिकारीचे उद्देशाने स्फोटक बॉम्ब गोळे ठेवून एक वन्यप्राणी रानडूक्कराची शिकार केलेचे सदर आरोपी यांनी मान्य केले. 

      ही कारवाई ही श्री. जी. गुरूप्रसाद, उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर, श्री.एन.एस.कांबळे,सहाय्यक वनसंरक्षक (खा. कु.तो. व वन्यजीव ) कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे मार्गदशनाखाली श्री. एम. व्ही. कोळी वनक्षेत्रपाल आजरा, श्री. एस. डी. शिंदे, वनपाल दक्षिण आजरा, श्री. एस. एस. मुजावर वनपाल उत्तर आजरा, श्री.बी.आर. निकम वनपाल धनगरमोळा, वनरक्षक श्री.टी.के.कळविकट्टेकर, श्री.पी.एस. बेलवळेकर, श्री. बी. ए. पाटील, श्री. एस. बी. दुंडगे, श्रीम.एस.एस. पताडे, श्रीम.ए.एस. घोरपडे यांनी केली असून पूढील तपास सुरु आहे.








Post a Comment

0 Comments