पर्यटन सुविधा निर्मिती कार्यक्रमला गती मिळणार
• जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा पर्यटन समितीच्या बैठकीत निर्णय • ' होम स्टे ' सह तालुकास्तरावरील पर्यटन सुविधा सुधारण्यासाठी नियोजन होणार
कोल्हापूर , दि . 18 : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज हजारो भाविक तसेच पर्यटक भेट देवून येथील धार्मिक तसेच इतर पर्यटन स्थळांना भेटी देत असतात . परंतु आता यामध्ये पर्यटकांनी अधिक प्रमाणात वास्तव्यास राहून येथील धार्मिक , ऐतिहासिक , नैसर्गिक तसेच कृषी पर्यटनाचा आस्वाद घ्यावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत . जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी , त्यावर अवलंबून असलेल्या घटकांसाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होण्यासाठी पर्यटक हा जास्तीत जास्म कोल्हापूरमधील वेगवेगळ्या ठिकाणी भेट देईल तसेच तो त्याठिकाणी वास्तव्यही करील यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन आराखडा तयार करण्यात येणार आहे . यासाठी सर्व पर्यटन ठिकाणांची माहिती एकत्रित करून डेटा बेस तयार करण्यात येणार आहे . यामुळे कोणत्या ठिकाणी पर्यटन विकासाला वाव आहे व कुठे सुविधा उभारण्याची गरज आहे हे लक्षात येणार आहे . यानुसारच जिल्हा पर्यटन विकास आराखड्याची अंमलबजावणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले . यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे , अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी , उपजिल्हाधिकारी महसूल डॉ . संपत खिलारी , अति . आयुक्त राहूल रोकडे , पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार , महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र अजयकुमार पाटील यांच्यासह समिती सदस्य वसीम सरकावस , प्रमोद पाटील , विनोद कंबोज , उज्ज्वल नागेशकर , बळीराम वराडे उपस्थित होते .
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची यादी तयार करून त्यासाठी काय आवश्यक बदल करावयाचे आहेत याच्या नोंदीही पर्यटन स्थळांच्या डेटाबेस मध्ये घेण्यात याव्यात . पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा समितीसह प्रत्येक तालुक्यातील पर्यटन समिती चांगल्या पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी नियोजन केले जाणार आहे . तालुका निहाय पर्यटन स्थळांच्या याद्या करून त्या ठिकाणी कसे जाता येईल , त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधा , त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधा यांची माहिती एकत्रित करण्याच्या सूचना तालुकास्तरीय समितीला देण्यात येणार आहेत . जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी , तेथील सुविधा वाढवण्यासाठी , त्या त्या विभागाच्या अनुषंगाने आराखडे तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे . उदाहरणार्थ वनविभाग , जलसंपदा , पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांनी त्या त्या ठिकाणच्या करावयाच्या कामकाजाची रूपरेषा तयार करावयाची आहे . जिल्ह्यातील पर्यटनास चालना देण्यासाठीची क्षमता कोणत्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची जास्त आहे हे ओळखून त्या ठिकाणी प्राधान्य क्रमाने आवश्कतमा बाबींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे .
जिल्ह्यात मळणार ' होम ' प्रकल्पाला गती
पर्यटकांना कमीत कमी व परवडणाऱ्या खर्चात राहण्यासाठी जिल्ह्यातील ' होम स्टे ' ची संख्या वाढवण्यासाठी नियोजन येत्या काळात होणार आहे . यासाठी इच्छुक व्यावसायिकांची यादी तयार करून त्यांना पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रशिक्षित केले जाणार आहे . तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त होम स्टे बाबत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत . जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखड्यामध्ये प्रत्येक विभागाकडून नियोजन घेऊन त्यानुसारच जिल्हा पर्यटन आराखडा तयार करण्यात येणार असून यासाठी आवश्यक निधी टप्याटप्याने जिल्हा नियोजन समिती मधून देण्यात येणार आहे .
सध्या तातडीने पहिल्या टप्पात जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांचे मुख्य रस्त्यावरील दिशादर्शक फलक लावण्याचे काम हाती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल यांनी दिल्या . त्याचबरोबर मधाचं गाव , पुस्तकांचं गाव , यासारखी कन्सेफ्
वापरून येत्या काळात गुळाचं गाव , दुधाचं गाव , साहित्यिकांचे गाव अशा पद्धतीने विशेष पर्यटनालाही चालना देण्यात येणार आहे . पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था यांना एक किंवा दोन किंवा तीन किंवा आठ दिवसांचे विशेष पॅकेज पर्यटकांसाठी तयार करून माहितीपर देण्यात येणार आहे . कोल्हापूर येथे जिल्हा , राज्य समरावरील पर्यटकांबरोबरच येत्या काळात देश आणि आंतरराष्ट्रीय स्म्रावरील पर्यटकही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन एकापेक्षा जार दिवसांचे पर्यटन करतील यासाठी नियोजन केले जाणार आहे . जिल्ह्यातील सध्या नोंदणीकृत तीन हजार हॉटेल रूम्सच्या सुविधा आहेत तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी तेवढ्याच सोयी आहेत अशा मिळून सहा हजार खोल्यांची व्यवस्था असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले . मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची गरज असून हॉटेल्स बरोबरच होम स्टे साठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत .
महानगरपालिका , नगरपालिका तसेच तहसील स्तरावरील पर्यटन समितीने आवश्यक सुविधा , पर्यटन आराखडे यांची माहिती एकत्रित करून डेटाबेस सादर करावा . त्याचबरोबर पर्यटन क्षेत्राला अधिक प्रसिद्धी देण्यासाठी ही नियोजन करण्यात येणार असून यासाठी प्रसिद्धी आराखड्याचीही निर्मिती करण्यात येणार आहे . अस्तित्वात असलेले पर्यटन स्थळे शाश्वत राहण्यासाठी प्राधान्माने आराखड्यात विविध उपाय योजना राबवण्यासाठी नियोजन केले जाणार आहे . तसेच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता व पर्यावरण सुरक्षितता यासाठी प्लास्टिक बंदी सारख्या उपाययोजनाही राबवण्यासाठी येत्या काळात नियोजन होणार आहे .

Post a Comment
0 Comments