Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

करवीर पोलीस ठाणेकडील अपहरण गुन्ह्यातील दोन निष्पन्न आरोपी अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा , कोल्हापूर यांची कामगिरी फत्ते.



करवीर पोलीस ठाणेकडील अपहरण गुन्ह्यातील दोन निष्पन्न आरोपी अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा , कोल्हापूर यांची कामगिरी फत्ते.

दि . 15/02/2025 (करवीर, कोल्हापूर).

श्री . मोहन दिनकर आडसुळ वय 55 वर्षे रा . निगवे दुमाला , ता . करवीर याचा मुलगा श्री . विशाल मोहन आडसुळ वय 26 रा . भुये , ता . करवीर , जि . कोल्हापूर यास दि . 09/02/2025 रोजी रात्रौ 09.15 चे सुमारास भुयेवाडी कमानीजवळून , ता . करवीर येथून अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाकरीता अपहरण करुन चारचाकी गाडी मधून नेले आहे , अशा मजकुरची करवीर पोलीस ठाणे येथे दिले तक्रारीवरुन करवीर पोलीस ठाणे येथे गु . रं . नं . 67/2025 भा . न्या . स . क . 140 ( 3 ) प्रमाणे दि . 09/02/2025 रोजी गुन्हा दाखल आहे .

सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नावे 1 ) श्रीकृष्ण महादेव कोकरे रा . कुपवाड , मिरज , सांगली , 2 ) आरोपी नामे धीरज उर्फ हणमंत नामदेव पाटील व . व .56 , रा . कवटे पिरान , ता . मिरज , जि . सांगली , 3 ) राजेंद्र परमेश्वर कट्टीमनी व . व . 33 , रा . कुपवाड एमआयडीसी , ज्ञानगिरी वसाहत , सावळी , ता . मिरज , जि . सांगली यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकाने दिनांक 10/02/2025 रोजी ताब्यात घेवून त्यांचे कब्जात मिळून आले अपहरीत व्यक्ती नावे विशाल मोहन आडसुळ याची सुटका करून त्यास औषधोपचाराकरीता कानडे हॉस्पिटल , व्हिनस कॉर्नर , कोल्हापूर येथे अॅडमिट करण्यात आले होते . तसेच त्यावेळी सदर आरोपींच्याकडे केले तपासात त्यांचे सदर गुन्ह्यात 4 ) वैभव घाटगे , रा . मिरज , 5 ) मारुती पवार , 6 ) संग्राम धुमाळ , 7 ) आणखिन एकजण ( नाव व पत्ता माहीत नाही . ) इतर साथीदार असलेचे निष्पन्न झाले होते .

सदर गुन्ह्यातील इतर साथीदारांचा पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांचे पथकाकडून शोध सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांना , आरोपी नामे वैभव घाटगे व संग्राम धुमाळ हे इचलकरंजी येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून सापळा रचला असता आरोपी नामे वैभव रामचंद्र घाडगे रा . शाहुनगर मिणचे , ता . हातकणंगले , जि . कोल्हापूर सध्या रा . मिरज उस्माने मोहल्ला , मेरी भोरी नर्सिंग स्कुल मिरज , ता . मिरज , जि . सांगली व संग्राम सतिश धुमाळ रा . पाण्याच्या टाकीजवळ सांगली नाका , इचलकरंजी , ता . हातकणंगले , जि . कोल्हापूर हे गुन्ह्यात वापरलेल्या इरटिकाकार नं . MH - 10 - EE - 8795 सह मिळुन आलेने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून श्रीकृष्ण महादेव कोकरे रा . वाघमोडेनगर , कुपवाड , ता . मिरज , जि . सांगली याचे सांगणेवरून वैभव रामचंद्र घाडगे , संग्राम सतिश धुमाळ , निखील विजय कांबळे रा . मिरज , अश्यानी इरटिकाकार नं . MH - 10 - EE - 8795 मधून दिनांक 08/02 / 2025 रोजी रात्री भुये , ता . करवीर येथे जावून विशाल मोहन आडसुळ याचे अपहरण करून त्यास सांगली येथे नेवून श्रीकृष्ण कोकरे , मारुती पवार व इतर लोकांच्या ताब्यात विशाल आडसुळ याला दिले असल्याचे सांगितले आहे . नमुद आरोपीना जप्त इरटिका कारसह पुढील कायदेशीर कारवाई करीता करवीर पोलीस ठाणे येथे रिपोर्टाव्दारे हजर केलेले आहेत . उर्वरीत आरोपी नामे निखील विजय कांबळे व मारुती पवार यांचा शोध सुरू आहे .

सदरची कामगिरी मा . पोलीस अधीक्षक , श्री . महेंद्र पंडित सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्री . रविंद्र कळमकर , पोलीस उपनिरीक्षक श्री . शेष मोरे , पोलीस अंमलदार अमोल कोळेकर , रामचंद्र कोळी , सुरेश पाटील , रूपेश माने , विनोद कांबळे , अमित मर्दाने यांनी केली आहे .


Post a Comment

0 Comments