बेकायदेशीर गांजा अंमली पदार्थाचा विक्री करणाया इसमास पकडून त्याचेकडून 1 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकुण 25,000 / - रु किंमतीचा मुददेमाल जप्त
दि . 08/02/2025
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा , कोल्हापूर यांची धडक कारवाई.
मा . पोलीस अधीक्षक , श्री . महेंद्र पंडित सो यांनी अवैध व्यवसाय , अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत .
मा.पोलीस अधीक्षक साो , यांनी दिले आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करुन रेकॉर्ड वरील गुन्हेगार बाबत माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार संदिप पाटील व शिवानंद मठपती यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की , वडगांव पोलीस ठाणे हद्दीतील भादोले गावचे स्मशानभूमीजवळ गोविंद अवघडे हा इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती . त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री . रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे , पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस अंमलदारांचे पथक यांचेसह सदर ठिकाणी जाऊन खात्री करून सापळा लावुन दि . 08/02/2025 रोजी छापा टाकला असता आरोपी इसम नामे गोविंद कृष्णा अवघडे वय 65 वर्षे रा . भादोले , ता हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर याचे ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला . सदरबाबत दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून त्याचे कब्जातून बेकायदेशिर विक्रीकरिता आणलेला एकूण 1 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 25,000 / - रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे . आरोपी विरुध्द वडगांव पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्हयाचा पुढील तपास वडगांव पोलीस ठाणे करीत आहेत .
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक , श्री . महेंद्र पंडितसो , यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सपोनि चेतन मसुटगे , पोसई शेष मोरे , तसेच पोलीस अंमलदार अशोक पोवार , संदिप पाटील , रामचंद्र कोळी , संजय पडवळ , हिंदूराव केसरे , अमित सर्जे , युवराज पाटील , कृष्णात पिंगळे , सुरेश पाटील , रुपेश माने , वसंत पिंगळे , प्रकाश पाटील , विनायक चौगुले , राजेंद्र वरंडेकर , हंबीर अतिग्रे यांनी केली आहे .

Post a Comment
0 Comments