Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

मावळा ग्रुपतर्फे टेंबलाई क्रिडांगणावर 14 वर्षाखालील मुलांच्या भव्य फुटबॉल स्पर्धा पार पडल्या.




  कोल्हापूर :-  मावळा  ग्रुपतर्फे टेंबलाई क्रिडांगणावर 14 वर्षाखालील मुलांच्या भव्य फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत एकूण 6 संघांनी सहभाग घेतला ज्यांनी तोडीस तोड खेळ केला. दिवसभरात पार पडलेल्या स्पर्धेत पहिला क्रमांकसह वादळ तालीम संघाला कॉस्को कंपनीचा फुटबॉल व दुसरा क्रमांकांसह आदर्श पॅटर्न संघाला स्पार्टन कंपनीचा फुटबॉल हे पारितोषिक पटकावले. अंतिम सामान्यात उत्कृष्ठ खेळ करणाऱ्या आदर्श पॅटर्नच्या रेहानला मालिकावीरचा बहुमानासह स्टडचे बूट, स्टोकिंग्स व शिंगपॅड मिळाले . या स्पर्धेसाठी श्री. प्रवीणदादा केसरकर व श्री. राजेंद्रदादा पाटील यांचे सहकार्य लाभले. मावळा ग्रुपतर्फे या सामान्यांचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. स्पर्धेमद्धे 1. फाईट क्लब 2. आदर्श पॅटर्न 3. A बोईज 4. बी बी बोईज 5. SFC बोईज 6. वादळ तालीम यांनी सहभाग घेतला. स्पर्धेदरम्यान टेंबलाईवाडी विद्यालय विरुद्ध मावळा ग्रुप यांच्यात विशेष अतिथी सामना पार पडला ज्यामद्धे टेंबलाईवाडी विद्यालयाने 1-0 ने मावळा ग्रुपवर विजय मिळवला. स्पर्धेवेळी राजेंद्र पाटील, अमर कंदले, मदन काटे, हेमंत देशमुख तसेच टेंबलाई क्रीडांगणाचे व मावळा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान टेंबलाईवाडी विद्यालयाचे फूटबॉल मधील सहभागी मुले  व ,क्रीडा शिक्षक अशोक गवडे तसेच राजेश वाघमारे सर या शिक्षकांचा महापालिकेच्या शाळांतर्गत पार पडलेल्या स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल फेटे बांधून विशेष सत्कार करण्यात आला.


Post a Comment

0 Comments