Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

खासदार , धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुल येथे अन्नधान्य कपडे व इतर वस्तूंचे केले वाटप



खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुलांना अन्नधान्यकपडे आणि इतर भेटवस्तूंचे झाले वाटप

कोल्हापूर 27/1/25
     कळत नकळत त्यांच्या हातून गुन्हे घडले आहेतकाहींची फसवणूक झालीकाहींना त्यांच्या पालकांनी जन्मताच कोंडाळ्यात टाकून दिलेकाहीजणांवर लहान वयातच अन्याय झालाअशा बालकांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी बालकल्याण संकुलातील विश्वस्त आणि कर्मचार्यांकडून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेतत्यांच्या विविध उपक्रमांना नेहमी पाठबळ असेलअसा विश्वास सौअंजली विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केलाखासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त संकुलातील मुलांना अन्नधान्यकपडे आणि इतर भेटवस्तू वाटप उपक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
कोल्हापुरातील मंगळवार पेठ इथल्या बालकल्याण संकुलातअनाथ मुलेअल्पवयीन गुन्हेगारअल्पवयीन मुलीचाळीस वर्षापर्यंतच्या विधवाबेवारस महिला यांना आश्रय दिला जातोत्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातातअनेक दानशुरांच्या मदतीवर या संस्थेचे कार्य सुरू आहेखासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या स्नुषा सौअंजली विश्वराज महाडिक यांनी एक विशेष उपक्रम राबवलाशनिवारी सायंकाळी सौअंजली विश्वराज महाडिक यांनी बालकल्याण संकुलातील विविध विभागांना भेट दिलीइथल्या मुलांचे आणि मुलींचं शिक्षणत्यांची दुखं जाणून घेतलीतसंच संस्थेच्या कार्याविषयी माहिती घेतलीत्यानंतर संस्थेच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विश्वस्त पद्मा तिवले यांनी सौमहाडिक यांचे स्वागत केलेविभाग प्रमुख तुकाराम कदममीना भालेपरीविक्षा अधिकारी सचिन माने यांनी बालकल्याण संकुलाच्या वाटचालीबद्दल माहिती दिलीयावेळी सौअंजली विश्वराज महाडिक यांच्या हस्ते संस्थेला दोन लाख रुपयांचे अन्नधान्यकपडे आणि आवश्यक साहित्य देण्यात आलेअनाथ मुलांसह पीडितनिराधार महिलांना आधार देण्याचे काम प्रामाणिकपणे केले जात आहेया संस्थेचे विश्वस्त आणि कर्मचार्यांकडून खर्या अर्थानं मानवतेची सेवा होत असल्याचे सौअंजली महाडिक यांनी बोलून दाखवलेभविष्यात नेहमीच या संकुलासाठी महाडिक परिवाराचं सहकार्य असेलअसे त्यांनी आश्वासन दिले

Post a Comment

0 Comments