Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

गोर गरीबांना लूटणारा अँटी करप्शन च्या जाळ्यात

 


कोल्हापूर:-

हातकणंगले पंचायत समिती मधील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अविनाश सुतार  हा , अँटी करप्शन च्या जाळ्यात.

रमाई आवास योजना ,राजीव गांधी आवास योजना, अशा विविध शासकीय योजना शासनामार्फत राबविण्यात येत असून यावरती आळा कोण बसवणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्ष भेडसावत होता. शासनाने पारदर्शकता राहावी म्हणून खातेदाराच्या बँकेत चेक दिल्यावर पैसे जमा होतात पण भष्टाचार इतका फोफवला असल्यामुळे, गोरगरिबांना सदरची घरकुल योजना मंजूर झाली तरी देखील मड्यावरचे लोणी खाल्ल्याशिवाय भ्रष्ट यंत्रणेला जमतच नाही ,गावातील दलाल मंडळी ,घरे मंजूर करणारे, तसेच निधी मंजूर करून देणाऱ्या पासून  ते चेक काढणार्या पर्यंत साखळी काम करत असलेली पहायाला मिळते,काय तरी त्रूटी काढायची नाहक त्रास लाभार्थ्यांना द्यायचा व आपली पोळी भाजून घ्यायची हा प्रकार गेले अनेक वर्षापासून चालू आहे .  चि मिरी  घेतल्याशिवाय घरकुल  चे  अनुदान निघत नाहीत अशा वारंवार चर्चा सर्व जिल्ह्यात ऐकण्यस मिळत आहेत.शासणाकडून मिळणारे तूटपंजी रक्कम आणी वरतून लाटणारी चोर मंडळीचा हिसा.या मुळे , गोरगरीब त्रस्त होते दाद मागायची तरी कोणाकडे आवाज उठवला तर चेख थांबून ठेवण्यासारखे प्रकार समोर येत आहेत.काही राजकीय मंडळी देखील सदरच्या घरकुल योजनेमध्ये अपायकारक ठरत आहेत, राजकीय वादातून घरकुल मंजूर करणे किंवा ठराव न देणे असे प्रकार देखील अनेक वेळा पाहायला  मिळतात. तो ह्या पक्षाचा मी या पक्षाचा आणि ह्या सर्व गोष्टीवरून समजते.  गावातील पुढारी मंडळी देखील तोंडे बघून घरकुल मंजूर करतात ज्याच्या घरी ट्रॅक्टर सारखे वाहन व ,उत्पन्न जास्त असणाऱ्यांना देखिल घरकुल मंजूर झाले आहेत, पण काही गोरगरिबांना खरंच वंचित ठेवले आहे ,हे दृश्य आनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे.या गोष्टी वर आज ऐका जबाबदार व्यक्ती वर कारवाई झाली हे खरोखर कौतुक स्पद आहे .इतकंच काही तर अशा दोषी अधिकारी व  दलाल यांची मालमत्ता तपासून त्या वर कारवाई देखील व्हावी होय.

    लाचलुचपत प्रतिबंधक मोहिमेचे वचक आहे म्हणूनच गोरगरीब व दिन दुबळ्यांना आधार आहे.नाहीतर या भ्रष्ट यंत्रणेला आळा बसने शक्य नाही. जिल्हा आनेक कारवाई चा बडगा या विभागा मार्फत सूरु आहे.शासकीय पगार असून देखील लोक भ्रष्टाचार करतात अनेकांनी अमाप संपत्ती भ्रष्टाचाराच्या मार्फत कमवली आहे याकडे देखील अँटी करप्शन विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे .कोल्हापूर जिल्ह्याला सिंघम अशा स्टाईलच्या डि वाय  एस पी  मॅडम लाभले आहेत म्हणून सर्व शासकीय यंत्रणेवर सध्या वचक राहिला आहे.

  पाहुया सदरची कामगिरी.  शासनाच्या रमाई आवास घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना मंजूर झालेला निधी बँक खात्यात जमा करण्यासाठी लाच घेताना, हातकणंगले पंचायत समितीमधील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अविनाश सुतार हा लाच लुचपतच्या जाळ्यात सापडला आणि या सदरच्या कारवाईमुळे हातकणंगले पंचायत समितीत खळबळ उडली आहे.सापडला तर चोर नाही तर मोर.. तक्रारदार यांच्या आईच्या नावे रमाई आवास घरकुल योजनेतून १ लाख ५0 हजार रूपये मंजुर झाले आहेत. हे मंजुर झालेले पैसे पाच टप्प्यामध्ये लाभार्थांना मिळतात. त्यातील तीन टप्पे तक्रारदारांच्या आईच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. उरलेले दोन टप्प्यात पैसे कधी जमा होणार हे विचारण्यासाठी तक्रारदार हातकणंगले पंचायत समितीमध्ये गेले होते. त्यावेळी रमाई आवास घरकुल योजनचे काम पाहणारे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अविनाश सुतार यांनी दोन हप्ते जमा करण्यासाठी त्यांच्याकडे तेरा हजार रुपयांची मागणी केली.आपण जोपर्यंत पैसे देणार नाहीत तो पर्यंत खात्यात पैसे जमा करणार नाही असे संशयित आरोपी सुतार यांनी सांगितले.

तक्रारदार यांनी लुचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रारदार दिली. ACB विभाग श्रीमती वैष्णवी पाटील पोलीस उप‌अधीक्षक  कोल्हापूर पदाधिकारी यंत्रणा ऍक्टिव्ह मोड मध्ये आली .सापळा रचण्यात आला आणि अँटीकरप्शन च्या जाळ्यात  अभियंता अविनाश सुतार शेवटी सापडला. या कारवई मुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

       

Post a Comment

0 Comments