Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर ते पहा....



उल्लेखनीय सेवेबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर


कोल्हापूर , दि . 25 ( जिमाका ) : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे . शासनसेवा बजावत असताना श्री . फुलारी यांनी आजवर विविध ठिकाणी उत्कृष्ट काम केले आहे .

गडचिरोली , चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे . नागपूर शहरात मोका व एमपीडीए कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन गंभीर गुन्ह्यांमध्ये घट घडवून उत्कृष्ट कामगिरी केली . सन २०२० मध्ये कोरोना महामारी दरम्यान कायद्याची कडक अंमलबजावणी करून मानवतेची सेवा केली . कोल्हापूर , सातारा , मिरज , विशाळगड येथील जातीय संघर्ष , हिंसाचार , मराठा आरक्षणविषयक आंदोलनां दरम्यान समाजात तणावाची परिस्थिती उद्भवली असता जातीय सलोखा राखून सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना सातत्याने राबवून समाजामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण केले , शांतता राखली . सामाजिक ( Community ) पोलिसिंग उपाययोजनांची अंमलबजावणी करून सेवा ( S.E.V.A. ) प्रकल्पासारख्या नाविन्यपूर्ण योजना दुर्बल घटकांच्या मदतीसाठी राबविल्या . कोल्हापूर शहरातील दंगल परिस्थिती , विशाळगड अतिक्रमण , पुसेसावळी औध दंगल अशा दंगलसदृश्य परिस्थितीत जातीय घटनांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कौशल्यपूर्ण मार्गाने व सुसंवादाने सर्व परिस्थिती स्वतः हाताळून शांतता निर्माण केली . जातीय घटनांचे इतरत्र पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये , याकरीता कठोर कारवाई व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या . परिणामी मिरज , कराड , बार्शी , अक्कलकोट , जुन्नर , दौंड , खेड , औंध या पूर्ण भागात शांतता कायम राहिली . नागपूर , जळगाव , सांगली , पुणे , नाशिक याठिकाणी कार्यरत असतांना गंभीर व गुंतागंतीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे कार्य , सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांचे कौशल्यपूर्ण कामकाज वाखाणण्याजोगे आहे . मोहल्ला समिती , शांतता समिती या माध्यमांद्वारे ' सामाजिक सलोखा व शांतता कायम ठेवली . लोकसभा , विधानसभा २०२४ निवडणुका हिंसाचारमुक्त पार पाडण्यासाठी काम केले . काटेकोरपणे निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी केली . कोल्हापूर परिक्षेत्राला कर्नाटक आंतरराज्य सीमा आहे . समन्वय ठेवून व सोमावर्ती भागात तपासणी करून निवडणूक कालावधी दरम्यान कोणतीही अघटीत घटना घडणार नाही , याकरीता मार्गदर्शन केले . संपूर्ण निवडणूक प्रक्रिया भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या . त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर प्रथम क्रमांकावर आहे . पोलीसांबाबत सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा , यासाठी कम्युनिटी पोलिसिंग योजना राबवून सर्व सण समारंभ उत्सव शांततेत व उत्साहात साजरे झाले . अल्पसंख्याक समाजाचे पदाधिकारी , मंडळ यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून गणपती व ईद सणा दरम्यान विश्वासाचे वातावरण निर्माण केले . गणपती व ईद त्याचबरोबर इतर सर्व धार्मिक सण हे एकमेकांसोबत साजरे करण्याबाबत चालना देवून सामाजिक सलोखा राखला जाईल याबाबत प्रयत्न केले . नवरात्रोत्सव , भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन , पंढरपूर वारी , लोकसभा , विधानसभा निवडणुक २०२४ , मा . पंतप्रधान , मा . राष्ट्रपती व इतर व्हिव्हिआयपी मान्यवरांचे दौरे यांच्यासाठी सुरक्षा व संरक्षण व्यवस्था नियोजन व चोख व्यवस्थापन , मोर्चा , विविध आंदोलने यामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी मोहल्ला समिती , शांतता कमिटी , महिला दक्षता समिती अशा विविध समित्यांच्या बैठका घेवून जनतेचा विश्वास वृध्दींगत केला . भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले .

वन्यजीव गुन्ह्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हेल मासा उलटीची तस्करी करणाऱ्या टोळींचा छडा लावून अंदाजे ४५ कोटींचा अवैध मुद्देमाल जप्त करून यशस्वीरित्या कार्यवाही व गुन्हेगारांवर वचक ठेवला . परिक्षेत्रात शरीर विषयक , मालाविरूद्ध , महिलांवरील अत्याचार , संपत्ती व आर्थिक विषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी Visible पोलीसींग , स्ट्रीट पेट्रोलिंग , रात्रग्रस्त व नाकाबंदी यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सतत राबविल्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसविली . गुन्ह्यांचे प्रमाण घटले .

पुणे शहरात आर्थिक गुन्हे शाखा व सायबर लॅब स्थापन करून आर्थिक व सायबर सुरक्षा वाढवली . महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पोलीस उपनिरीक्षक , पोलीस उपअधीक्षक , परिविक्षाधीन भापोसे अधिकाऱ्यांचे दर्जेदार प्रशिक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान दिले . राज्य राखीव पोलीस दलामध्ये कर्मचाऱ्यांसाठी शस्त्र तपासणी , शस्त्रास्त्र साठा , निशाणेबाजी व क्रीडा कौशल्य विकासाकरीता योग्य प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले व योगदान दिले . त्यांच्या कार्यकाळातील या भरीव योगदानामुळे राज्य राखीव पोलीस दलाला विजेता ट्रॉफी व चॅम्पीयनशीप देवून गौरविण्यात आले .

मोटार परिवहन विभागात जुन्या वाहनांचे निर्लेखन , वाहनचालकांसाठी वाहन देखभाल दुरूस्ती प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे , कार्यशाळा नुतनीकरण , अशी वैविध्यपूर्ण कौशल्य विकासासाठी कामगिरी करून मोटार परिवहन विभागाचे आधुनिकीकरण संपूर्ण मोटार परिवहन वाहतूक विभागाचे कामकाज गतीमान केले .

कोल्हापूर परिक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे व शिरोळ पोलीस ठाणे हे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून २०२४ साठी घोषित झाले . कोल्हापूर पुणे परिक्षेत्रामधील नवीन पोलीस स्टेशन , निवासी इमारती यांची उभारणी करणे , पोलीस अधिकारी व कुटुंबीय यांच्या कल्याणासाठी उपाय , मानसिक ताण - तणाव हाताळणीचे उपाय , कौशल्यपूर्ण कामकाज प्रशिक्षण देणे यासाठी सातत्याने कार्य केले आहे . श्री . सुनिल फुलारी यांचे पोलीस विभागासाठी उत्कृष्ट योगदान , निष्कलंक सचोटीसह कर्तव्यनिष्ठ गुणवत्तापूर्ण कामगिरी व प्रामाणिक शिस्तप्रिय अधिक असा त्यांचा पोलीस विभागातील नावलौकिक आहे . तसेच श्री . सुनिल फुलारी यांनी पोलीसींग करीता कौशल्यपूर्ण , वैशिष्टपूर्ण योगदान सातत्याने दिले आहे . ते प्रभावी कामकाज करणारे उत्कृष्ट मार्गदर्शक अधिकारी आहेत , अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने दिली आहे

-------------------------------------------------





Post a Comment

0 Comments