इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांना १ जानेवारीपासून महागाई भत्याची अंमलबजावणी करा :-कामगार मंत्री आकाश फुंडकर
कोल्हापूर , दि . २२ ( जिमाका ) : इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगारांच्या दि . २८ मार्च २०१३ रोजीच्या संयुक्त करारानुसार होणाऱ्या वाढीव महागाई भत्याबाबत दिनांक १ जानेवारी २०२५ पासून महागाई भत्याची वाढ पिस रेटवर रुपांतरीत करुन ०.०८७ पैसे एवढी होत आहे . ती पुर्णांकामध्ये ९ पैसे ( ५२ पिकास मिटरवर आधारीत ) होत आहे . याद्वारे ९ पैसे महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी २०२५ पासून यंत्रमाग मधील सर्व कामगारांना अदा करावा . मालक व कामगार संघटनेने वरील महागाई भत्याची दिनांक १ जानेवारी २०२५ पासून अंमलबजावणी करावी व औद्योगिक शांतता व सुव्यवस्था राखावी , असे आवाहन कामगार मंत्री आकाश फुंडकर , अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ सहाय्यक कामगार आयुक्त ( इचलकरंजी ) जानकी भोईटे यांनी केले आहे .

Post a Comment
0 Comments