कणेरी फाटा गोकुळ शिरगाव हायवे ब्रिज कचऱ्याचे साम्राज्य..
करवीर तालुका ,मधील गोकुळ शिरगाव एम आय डी सी परिसरात हायवे ब्रिज वरती सार्वजनिक ठिकाणी रस्त्याकडे ला कचर्याचा ढिगदिसत आहे, थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, कचरा इत्यादी घातक गोष्टी टाकून नागरिक तसेच हायवे वरून प्रवास करणाऱ्या गाड्यांना देखील धोके दायक ठरले आहे .ग्रामपंचायतचेे दुर्लक्ष तसेच हायवे प्रशासन यांचे ही दुर्लक्ष स्पष्ट दिसून येत आहे .या गोष्टीकडे गांभीर्य पूर्वक लक्ष देऊन ब्रिजच्या कोपऱ्यावरती असणाऱ्या, कचऱ्याचा ढीग तात्काळ संबंधित विभागाने उचलावा, त्या ठिकाणी योग्य तो उपाययोजना करावी अन्यथा एकाद्याला जीव गमावा लागेल.इतकंच नाही तर सदरच्या कचऱ्याच्या डिगा वरती प्लास्टिक काचा, थर्माकोल,इतर कारखान्यातील कचरा देखील पडलेल्या चित्र दिसत आहे.आणखीन एक बाब म्हणजे
म्चित्रात पाहायला मिळत असलेल्या कचऱ्याच्या ढिगार्यावरून वाऱ्याने उडून आलेला एक थर्माकोलचा मोठा बॉक्स सर्विस रोड वरती पाहायला मिळत आहे.
Video
एखादी दुचाकी किंवा चार चाकी वाहन जातेवेळी हा जर थर्माकोल बॉक्सवर गाडी गेली तर एखादी दुर्घटना होऊ शकते शेजारी पाजारी तसेच प्रवासी देखील कचराया ढिहार्यावरती कचरा टाकत असतात.यामुळे भागात ,दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे या मुळे कुत्रे वावर वाढला आहे.हि एक आणखी समस्या बनली आहे.तरी त्वरीत याकडे लक्ष ,घालून योग्य तो उपाय योजना करावी अशी नागरिकांची,इच्छा व्यक्त होत आहे.
---------–-–--------------------------------------
----------------–-----------------------------------
---------------------------------------------------




Post a Comment
0 Comments