जयसिंगपूर डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या प्राध्यापकांचे १२ पेटंट्स यशस्वीपणे नोंद झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन विभागाच्या डॉ. एस. बी. पाटील, डॉ. टी. एच. मोहिते, प्रा. पी. पी. बेळगली व प्रा. एस बी होळकर, सिव्हिल विभागाचे डॉ. डी. बी. देसाई, डॉ. जे.एस. लंबे., विभाग प्रमुख डॉ. एम.बी. भिलवडे, प्रा. आर. ए. भारतीय या प्राध्यापकांनी आपल्या संशोधनाचे पेटंट्स नोंद केले आहेत. डॉ. जे. जे.मगदूम अभियांत्रिकीचे संशोधन व विकास क्षेत्रात हे यश कौतुकाचा आणि अभिनंदनाचा विषय बनले आहेत. ट्रस्टच्या व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांनी प्राध्यापकांच्या यशाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्राध्यापकांचा अनुभव व संशोधनात्मक वृत्ती विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळवून देण्यासाठी व संशोधनासाठी निश्चित फायदा होईल. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ५० हून अधिक पेटंट्स फाईल करण्याचे विद्यालयाचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी रिसर्च डेव्हलपमेंट सेलचे डीन डॉ. डी. बी. देसाई यांनी सांगितले.
औद्योगिक,शेती,वैद्यकीय व दुग्ध व्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात, कमी वेळेत, गुणवत्ता पूर्ण काम करण्यासाठी या संशोधनाचा फायदा होईल असे मत ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम यांनी व्यक्त केले. गुणवंत आणि यशवंत प्राध्यापकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे, प्राचार्य डॉ. गोपाळ मुलुगुंड उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments