कोल्हापूर:- जिल्हयातील व गोकुळ शिरगांव वसाहतीमधील नावाजलेल्या गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन [ गोशिमा ] ची सन २०२४ ते २०२९ करीता कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई , माजी अध्यक्ष सचिन शिरगांवकर , राजीव परीख व दिपक चोरगे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक सुरळीत पार पडली.
गोशिमाचे विद्यमान अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई यांनी गोशिमा निवडणूकी मधील बिनविरोधाची परंपरा कायम रहाणेसाठी या निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला त्यानंतर निवडणूक अधिकारी ॲड.इंद्रजित चव्हाण , संजय शेटे व राजू पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली.सदरची निवडणूक खेळीमेळीत पार पडली
गोशिमा संस्थेच्या सध्या असलेल्या कार्यकारी संचालक मंडळातील सात संचालक कमी होउन त्या जागी नवीन उमदया आठ तरूण संचालकांची निवड कार्यकारी मंडळात करण्यात आली आहे. तरूण उदयोजकांना वाव देऊन संस्थेच्या नविन कार्यकारी मंडळात वरीष्ठ संचालक व नूतन आठ संचालक यांचा योग्य समन्वय साधून गोशिमाचा पुढील कार्यकाळ यशस्विरीत्या व्हावा याची काळजी घेण्यात आली आहे.
सन २०२४ ते २०२९ सालाकरीता बिनविरोध निवड झालेल्या कार्यकारीणी सदस्य संचालकांची नावे खालील प्रमाणे आहेत.
सर्वश्री दिपक चोरगे , स्वरूप कदम , सुनील शेळके , संजय देशिंगे, रणजीत पाटील , मंगेश पाटील , अमोल दिलीप यादव , नचिकेत कुंभोजकर , राजवर्धन जगदाळे , बंडोपंत यादव , सत्यजित चंद्रकांत जाधव , अनिरुद्ध तगारे , रणजीत मोरे , रामचंद्र दुंडाप्पा लोहार , व्ही.आर.जगताप.

Post a Comment
0 Comments