Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

मानव अधिकार रक्षक मंच तर्फे, शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वातंत्रता दिवस साजरा करण्यात आले,

मानव अधिकार रक्षक मंच तर्फे  शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून  स्वातंत्रता दिवस साजरा करण्यात आले,

 दि 15/8 24 नमाड :- स्वातंत्र्यदिन हा  लोकोत्सव व्हावा. स्वातंत्र्य दिन हा केवळ औपचारिकता म्हणून न राहता तो लोकोत्सव व्हायला हवा. या निमित्ताने मानव अधिकार रक्षक मंच तर्फे मनमाड शहरात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.

या निमित्ताने अंगणवाडी क्र 70 कॅम्प नं 2 येथे लहान मुलांना तिरंगा झेंडे व मिठाई (खाऊ ) वाटप करण्यात आले  या वेळी अंगणवाडी सेविका संगीता गवळी मॅडम, मदतनीस शकुंतला पाथरे मॅडम, उषा बोरसे मॅडम यांचे शॉल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले 

तसेच मनमाड शहर पोलीस ठाण्यात नुतन पोलीस निरीक्षक विजय करे सर यांच शॉल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करून, मनमाड शहर शहरातील सर्व पोलीस अधिकारी पोलीस बांधव / महिला पोलीस यांना तिरंगा शॉल व तिरंगा झेंडा भेट देऊन मिठाई वाटप करण्यात आले. तसेच  मानव अधिकार रक्षक मंच तर्फे मनमाड शहरातील विविध शाळेना भेट देऊन शाळा समिती व शिक्षकांचे देखील सत्कार करण्यात आले


या वेळी. पारतंत्र स्वातंत्रता साठी  अनेकांच्या हौतात्म्यनी आपल्या प्राणाची आहुती दिल्या नंतर सन 1947  मध्ये आपला भारत देश हा स्वतंत्र झाला. भावी पिढ्यांना या दिवसाचे मोल लक्षात येणे खुप गरजेचे आहे, अन्यथा स्वातंत्र्य दिन म्हणजे केवळ एक सरकारी सुटी असाच पुढच्या पिढीला  समज होईल.

म्हणून अशा सर्व उपक्रमांमध्ये आपण आपला सक्रिय सहभाग नोंदवायला हवा. त्यामुळे अधिकाधिक नागरिक हे स्वातंत्र्य दिनाच्या लोकोत्सवात सहभागी होतील. त्यातून आपण या सार्वभौम देशाचे नागरिक आहोत ही भावना आपल्या मनता अधिक दृढ होईल. व राष्ट्रीय प्रतिके, पराक्रमी इतिहास याबद्दल आस्था निर्माण होतील. त्यामुळेच आपल्यास खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन चिरायू होईल. असे मनोगत  मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीयध्यक्ष उल्हास डफळे यांनी व्यक्त केले, या वेळी, मनमाड शहर पोलीस विभाग सह मानव अधिकार रक्षक मंच चे. राष्ट्रीय महिलाध्यक्ष दीपाली डफळे, नाशिक जिल्हा सचिव वसीम शेख, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख वसीम शेख (बब्लू मियाँ )

नांदगाव तालुकाध्यक्ष तौफिक पठाण, नांदगाव तालुकाउपाध्यक्ष आबीद शेख, विशाल छाजेड, पापा पठाण, कादीर शेख, मनोज केदारी, आदी सभासद उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments