पै. ऋतुजाची अभिमानास्पद कामगिरी...
करवीर तालुक्यातील पाचगाव येथील महिला पैलवान ऋतुजा संतोष गुरव हिने सी राचा थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीस्पर्धेत 'सिल्वर मेडल' 🥈 मिळवले आहे. ऋतुजाच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल भागीरथी महिला संस्थेचे अध्यक्ष सौ. अरुंधती महाडिक यांनी तिचे अभिनंदन केले.
ऋतुजा ही सध्या पाचगाव येथील भैरवनाथ क्रीडा संकुलनमध्ये सराव करत आहे. तिच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीला तिचे प्रशिक्षक श्री. मानतेश पाटील व आई-वडिलांचे योग्य मार्गदर्शन लाभले, याबद्दल त्यांचेही हार्दिक अभिनंदन केले व ऋतुजाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!

Post a Comment
0 Comments