वनपाल गस्त घालत असताना शिकारीच अडकले जाळ्यात
रविवार दि.०७/०७/२०२४ रोजी आजरा वनपरिक्षेत्रातील वनपाल गडहिंग्लज, वनरक्षक गडहिंग्लज हे वनक्षेत्रात गस्त घालत असताना नियतक्षेत्र गडहिंग्लज येथील चोथ्याची खोप ते धामणे गावाकडे रोडने जात असता उत्तूर फाट्यावर दोन इसम हातामध्ये दोन पिशव्या घेऊन संशयीत रित्या दिसून आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचेकडे १ मृत ससा, २ जाळ्या, १ विळा, १२ काठ्या, २ मोबाईल, २ पिशव्या इ. साहित्य मिळून आलेने त्यांचेवर वनरक्षक गडहिंग्लज यांनी WL-०५/२०२४, दि.०७/०७/२०२४ ने गुन्हा नोंद करून सदरचे साहित्य जप्त करणेत आले आहे. सदरची कारवाई ही मा.श्री.जी गुरूप्रसाद, उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर, मा.श्रीम.आदिती भारव्दाज, उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर(अति.कार्यभार), मा.श्री.एन.एस. कांबळे, सहाय्यक वनसंरक्षक (खा.कु.तो. व वन्यजीव) कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे मार्गदशनाखाली श्रीम.स्मिता.रा.डाके वनक्षेत्रपाल आजरा, श्री.बाळेश बा.न्हावी वनपाल गडहिंग्लज श्री. एस.के.नीळकंठ वनपाल दक्षिण आजरा व श्री.जी.व्ही.केंद्रे, वनरक्षक गडहिंग्लज यांनी केली.
----------------------------------------------------


Post a Comment
0 Comments