Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

थेठ मा. मुख्यमंत्री यांना केली विनंती, आपत्तीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवी



नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवी,

        👆Video👆

         
     👆 Video👆

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावातील रहिवासी श्री. जगन्नाथ श्रीपती कोळेकर हे पसरणी घाटात मेंढ्या चारत असताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. तेथील ओढ्यास जोरदार पाऊसाचे पाणी आले. तेवढ्यात जोरदार विज मेंढ्यावर पडली. कोळेकर यांच्या 150 मेंढ्यापैकी 112 मेंढ्या जाग्यावर संपल्या. त्यातील अनेक मेंढ्या ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेल्या . काही मृत मेंढ्या सापडल्या त्या पाण्यातून व चिखलातून ओढून बाहेर काढण्यात आल्या. त्यांचा पंचनामा करण्यात आला आहे. कोळेकर परिवारावर नैसर्गिक आपत्तीने संकट कोसळले आहे. तरी शासनामार्फत 112 मृत मेंढ्यांची भरपाई मिळावी अशी विनंती प्रा: डॉ संतोष कोळेकर अध्यक्ष:यशवंत ब्रिगेड,महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments