Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

जनतेच्या विश्वासाला पात्र राहून अपेक्षित काम केले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन*

 


कसबा सांगावमध्ये रस्ता खडीकरणाचा प्रारंभ
 सांगावमध्ये रस्ता खडीकरणाचा प्रारंभ

कसबा सांगाव, दि. १९

जनतेच्या विश्वासाला पात्र राहिलो आणि जनतेला अपेक्षित असलेले काम केले, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.  

कसबा सांगाव ता. कागल येथे पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. येथील टेंभी रस्ता ते सुळकुड रोड या दाईंगडे  पानंदीतून जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव नरसू माळी होते.

            भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जनतेने मला सलग पाचवेळा आमदारपदी विराजमान केले. जनतेला अपेक्षित असलेला विकास करण्यामध्ये यशस्वी झालो. कमी- जास्त मिळालेल्या मतांचा कधीच विचार न करता सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहिलो. कसबा सांगावसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाचा नियोजनबद्ध विकास करू शकलो याचे समाधान वाटते, असेही ते म्हणाले.          

मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, कसबा सांगावसारख्या मोठ्या गावातून गावाच्या मधूनच मुख्य रस्ता जातो. त्यामुळे अपघातासह वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. विशेषता: ऊस हंगामामध्ये फारच वाहतूक कोंडी होते. म्हणून बायपास रोड करण्यासाठी मी गेली वीस वर्षे प्रयत्न करीत होतो. हा रस्ता जरी होत असला तरी या समस्येवर ग्रामस्थांच्या संमतीतून भविष्यात मार्ग काढावाच लागेल.....   

     या वेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, राहुल हेरवाडे यांचीही भाषणे झाली.       

यावेळी जयसिंग कांबळे, राजेंद्र माने, अरविंद माळी, संतोष माळी, राहुल हेरवाडे, बाळासाहेब दाईंगडे, महादेव दाईंगडे,  संदीप दाईंगडे, उमेश माळी, अक्षय माळी, बाळासाहेब माने, सागर माळी, सागर कांबळे, मिथुन किल्लेदार,  अण्णासाहेब गंगाई आदी प्रमुख उपस्थित होते.            

-------------------------------------------







Post a Comment

0 Comments