माझ्या मुलीला आईने जन्म दिला पण मी तिला पुनर्जन्म दिला
अनिल दत्तात्रेय बकरे वय वर्ष 68 सध्या राहणार विक्रम नगर स्वामी समर्थ मंदिर शेजारी कोल्हापूर. हे सध्या उंचगाव ते बकरे टिलर्स या नावाने प्रसिद्ध आहेत सर्व सामान्य कुटुंबातून येणारी ही व्यक्ती या व्यक्तीने आपल्या जीवाची कसलीही परवा न करता स्वतःच्या मुलीला किडनी दान करून पुनर्जीवन दिले आहे .मुलगी वृषाली मिथुन गुजर राहणार पुणे वय 41 हिच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या वडील बकरे यांनी मोठे धाडस करून,
आपली किडनी तिला दान करुन तिला पुनर्जन्म दिला आहे ,याच्या मागील विशेष श्रेय त्यांची दुसरी पत्नी सौ वंदना आनिल बकरे यांची ही त्यांना साथ लाभली . या कारणासाठी बकरे यांना होकार देऊन किडनी देण्यास प्रवृत्त केले .पुणे येथील एका नामांकित दवाखान्यात त्यांचे ऑपरेशन 21 मे रोजी झालेत्यांची प्रकृती ठणठणीत असून सध्या, आपल्या नॉर्मल जीवन जगत आहेत त्यांनी एक चांगला कित्ता समाजा समोर घालून दिला आहे हे की अवयव दान हे श्रेष्ठ दान आहे.त्यांच्या या धाडसी कर्तुत्वाला विक्रमनगर तसेच उंचगाव मध्ये त्यांचे कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments