कोल्हापूर: रेल्वेगुडूस जुना जकात नाका येथील रस्ता झाला आहे जीवघेणा.
VIDEO पहा
कोल्हापूर :दि 29 जून 24 महानगरपालिकेच्या हद्दीत असणारा जुना जकात नकाा रेल्वे गुड्स जवळ हा रस्ता पूर्ण खराब झाला असून, रोज इथे हजारो दु चाकी गाड्या, छोटी वाहन, अवजड वाहने ,त्याच प्रमाणे मेनन कंपनीला जाणारी कर्मचारी, शाळकरी मुलं या रस्त्याने जाए करत असतात, आगदी जिव मुठीत घेऊन या ठिकाण्या पासून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची रेल्वे गुड्स समोर चाळण झाली असून मोठ्या प्रमाणात खोल खड्डे तयार झाले आहेत व पावसामुळे पाण्याने भरलेले आहे त्यामुळे, अनेक दुर्घटना झाल्या आहेत. पडलेल्या खड्डयाचा अंदाज येत नसल्यामुळे ये जा करणाऱ्या प्रवाशांना अंदाज येत नहीं.
दुचाकी स्वार अनेक वेळेला इथे पडले आहेत ,चार चाकी गाड्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे रेलवे गुड्स मधून बाहेर जाणारे शेकडो शासकीय धान्याचे अवजड वहाने व खताचे ट्रक इथून बाहेर जात असतात, त्यांनाही नहक त्रास सहन करावा लागत आहे, या सर्व गोष्टीकडे महानगरपालिका प्रशासन त्वरित लक्ष देऊन किमान पावसाळ्या साठी खड्डे मुरूम टाकून भरेल का? का जीवित हानी झाल्या शिवाय प्रशासनाचे डोळे उघडणार नाहीत काय? असा
नागरिकांतून संताप जनक भावना व्यक्त होत आहेत. तरी या ,गोष्टीकडे ताबडतोब कोल्हापूर महानगरपालिकेने लक्ष घालून योग्य ते उपाय योजना करावी.

Post a Comment
0 Comments