कोल्हापूर:जय हनुमान ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळ टेंबलाई वाडी व विक्रम नगर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना ज्येष्ठ नागरिकां कडून निवेदन देण्यात आले.तसेच खासदार छत्रपती शाहू महाराज व आमदार जयश्री जाधव यांनाही निवेदन देण्यात आले.
टेंबलाई टेकडीवर आनेक भावीकांना सुख सोयी पासून वंचीत आहेत,प्राचीन कालीन असलेले देवस्थान म्हाणून ,माता टेंबलाई ,माता मरगई,मारुती राया ,मसोबा राया व श्री गणपती बाप्पा यांचे इथे मंदिर आहेत,अनेक श्रद्धाळू व भाविक या पवित्र स्थानी येऊनदर्शन घेतात ,आम्ही सर्व नागरिक येथील स्थानिक रहिवासी असून आम्ही व भाविकांना ही त्रास होत आहे.
कारण इथे भाविक व स्थानिक नागरिकांसाठी सुख सुविधांचा तुटवडा आहे ,बाहेरून येणाऱ्या भाविकाला येथेच कोणत्याही प्रकारची मुबलक स्वछ पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शौचालया ची ना ,रस्त्याची सोय हि नाही, कचरा व्यवस्थापना ची सोय नाही, कचऱ्यामुळे भागात दुर्गंधी पसरली आहे, तसेच इथे असलेल्या सभागृहाची परिस्थिती पाहण्याजोगे आहे .भक्तांना निवास चि सोय नाही.
तसेच मंदिरा परिसरात अतिक्रमणही एक चिंतेची बाब बनली आहे महानगरपालिका तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी अध्यक्षयांना वारंवार लेखी पत्र व्यवहार करून देखील दुर्लक्ष करत आहेत ,तसेच श्री गणेश मूर्ती समोर झालेल्या बागेची दूर अवस्था कोणालाच दिसत नाही काय?
संध्याकाळी तळीराम व अमली पदार्थ सेवन करणारी यांचा वावर होत आहे, या मुळे लहान मुलं व महिला असुरक्षित असल्याचे महिलांकडून तक्रारी आल्या आहेत या सर्व गोष्टीला आळा बसण्यासाठी, सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा, पुरेस प्रकाश होण्यासाठी हॅलोजन बल्बची सोय करावी, तसेच महानगरपालिका व देवस्थान समिती यांनी येथे दोन कायम स्वरूपी कर्मचारी नियमित सुरक्षितते साठी ठेवावी ,श्रावण महिण्यात नवरात्रीसाठी महिला या ठिकाणी उपवासासाठी बसतात त्यांनाही बऱ्याच गोष्टीचा नहा त्रास सहन करावा लागत आहे . जिल्हाधिकारी, आमदार,खासदार, महानगरपालिका तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या गोष्टी कडे लक्ष देऊन भाविकांसाठी व नागरिकांसाठी सुख सोयी द्याव्यात असे निवेदन ज्येष्ठ नागरिकाकडून देण्यात आले.
आज जय हनुमान, जय नागरिक सेवा मंडळ टेंबलाईवाडी व विक्रमनगर जेष्ट नागरिक यांच्यातर्फे जिल्हाधिकारी व खासदार छत्रपती शाहू महाराज ,आमदार जयश्री जधव यांना टेंबलाई टेकडी च्या दुरावस्थेबद्दल निवेदन देण्यात आले
यावेळी बबन कावडे प्रसाद सुतार सलीम शेख बबन दोरकर श्रीरंग पाटील दिगंबर खुडे राजेश वाघमारे,दाविद वाघमारे आदी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments