Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

न्याय मिळाला: जन्मठेपेची शिक्षा असलेल्या पोक्सो अंतर्गत गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

 

कोल्हापूर,दि 30 मे 24 (प्रतिनिधी) - आजीवन कारावास तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा असलेल्या केस मधून आरोपी अशोक शिवाजी घाटगे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.  जुलै २०२१ मध्ये आरोपी विरुद्ध कागल पोलीस ठाण्यात अपहरण, भा द वि स कलम ३६३ , ३६६, ३५४ ड , ३७६ आणि पोक्सो कलम ४, ८, १२ प्रमाणे अपहरण , बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी विरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावा असल्याने त्याच्याविरुद्ध विशेष न्यायालय ,कोल्हापूर येथे  आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सदर केस मध्ये सरकारी पक्षातर्फे आरोपीच्या दोषसिद्धी साठी जोरदार मांडणी करण्यात आली होती. यावेळी कामाची सुनावणी ३ वर्ष मे विशेष न्यायालयात चालली. परंतु  आरोपीचे वकील सतिश कुंभार व भारत सोनूले यांनी केलेला युक्तिवाद योग्य व ग्राह्य मानून  प्रमुख जिल्हा न्यायाधीश, मा.कविता बी. अग्रवाल  यांनी दि ३० मे रोजी सर्व आरोपांतुन आरोपीची निर्दोष मुक्तता केली. 

 आरोपी तर्फे अँड सतिश कुंभार , अँड भारत सोनूले , अँड सारंग कुराडे ,अँड प्रिती देवर्डेकर ,यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments