Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी कडून “अमली पदार्थ” विरोधात कारवाई.



स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी कडून “अमली पदार्थ” विरोधात कारवाई.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील अमली पदार्थ व्यवसाय करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना सक्त सूचना दिल्या होत्या. 

त्या अनुषंगाने दिनांक ०४/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मौजे बोरज, शिव फाटा, तालुका खेड येथे एन.डी.पी.एस अधिनियमांतर्गत कारवाई करून आरोपी  

1) मोहन शिवशंकर कुशवाहा, वय 22 वर्ष, रा. खेर्डी, चिपळूण, 

2) शुभम संतोष गमरे वय 23 वर्ष राहणार लोटे घाणेखुंट ता. खेड व 

3) सचिन रामसहजीवन चौहान वय 20 वर्षे राहणार अजगनी नवानगर ता, खेड

यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून 3 किलो 954 ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ व आरोपींकडून वापरण्यात आलेले 1 वाहन व 3 मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण ₹ 1,48,190/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 

वरील तीनही आरोपींविरोधात खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 116/2024 गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एन.डी.पी.एस) १९८५ कलम 2, 8(c), 20(b) व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे. 

या गुन्ह्याचा पुढील तपास खेड पोलीस ठाण्याकडुन करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन परबकर, स्था.गु.शा. रत्नागिरी, यांच्या मार्गदर्शनाखाली खालील नमूद पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी केलेली आहे. 

सपोनि श्री. विजय जाधव, सपोफौ/65 श्री. बोरकर,  पो हवा/1188 श्री. सुभाष भागणे,  पो हवा/251 श्री. शांताराम झोरे,  पो हवा /477 श्री. नितीन डोमणे, पो हवा/301 श्री. बाळू पालकर,  चा.पोहवा/1532 श्री. दत्तात्रय कांबळे,  पोकाँ/215 श्री. अतुल कांबळे,  पोहवा/ श्री. सूरज भोळे, श्वान पथक,  ,पोहवा/ श्री. पाचवे, श्वान पथक व ,चा.पोहवा/ श्री. घुगरे, श्वान पथक.

Post a Comment

0 Comments