Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

आचारसंहितेचे योग्यरित्यापालन होत असल्याबाबत, जिल्हास्तरावरील स्थायी समितीची स्थापना

आचारसंहितेचे योग्यरित्यापालन होत असल्याबाबत,  जिल्हास्तरावरील स्थायी समितीची स्थापना 


कोल्हापूर दि. ४ (जिमाका) : लोकसभा निवडणूक २०२४ चे पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आदर्श आचारसंहितेचे योग्यरित्या पालन होत असल्याबाबत तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून निदर्शनास आणलेल्या आचारसंहिता तक्रारी अंतिम करणे, तसेच निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मुददे व अन्य बाबी ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील स्थायी समिती (Standing Committee) गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये  मान्यताप्राप्त व नोंदणीकृत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी याचा समावेश आहेत. उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये अंशतः बदल करण्यात आला असून जिल्हयासाठी खालीलप्रमाणे जिल्हास्तरावरील स्थायी समिती (District Level Standing Committee) पुर्नगठीत करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी  अध्यक्ष, पोलीस अधिक्षक, सदस्य, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर तथा नोडल अधिकारी, आचारसंहिता व्यवस्थापन व कायदा सुव्यवस्था. सदस्य, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी, सदस्य, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, बहुजन समाज पार्टी, सदस्य जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी सदस्य, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया (मार्क्ससिस्ट),  सदस्य, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, इंडियन नॅशनल काँग्रेस, सदस्य, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सदस्य, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, शिवसेना, सदस्य, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना,  सदस्य, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,  सदस्य, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार,  सदस्य, उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर सदस्य सचिव. 


Post a Comment

0 Comments