कोल्हापूर :दि 4 ,एप्रिल24 हुतात्मा उद्यान कोल्हापूर , पुलाच्या खाली ओढ्यात अज्ञात इसमाचे प्रेत सापडले, शरीराला धड नसून, मुंडकेच गायब केलेले चित्र दिसत होते,क्रूरपणे हत्या केली असून घटनास्थळी मुंडकेच नव्हते परिसरात दुर्गंधी सुटली होती ,पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी जे सी बी च्या साह्याने नालासफाई करण्यास गेले असता तिथे सदरचा हा मृत देह सापडला सदरची घटना ही जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली असून पोलीस निरीक्षक संजीव झाडे आपल्या पथकासह घटनास्थळी पोचून, शव बाहेर काढून पंचनामा सुरू ठेवला होता ,अज्ञात इसम कोण होता याची खात्री पटली नाही .पोलीस पुढील तपास करत आहेत.
____________________
________________________________________



Post a Comment
0 Comments