Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

अँटीकरप्शन च्या जाळ्यात अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती किर्ती देशमुख



कोल्हापूर:- दि 26  एप्रिल 2024 - रेस्टॉरंट वर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून कोणतीही कारवाई न करणेसाठी तक्रारदार यांच्याकडून २५,०००/-रू.लाच रक्कम स्वीकारताना अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. श्रीमती किर्ती धनाजी देशमुख.( रा. विश्व रेसीडेन्सी,फ्लॅट नं.२०२,ताराबाई पार्क कोल्हापूर, मूळ पत्ता रा. समर्थनगर, मोहोळ, ता.जि. सोलापूर.) असं त्यांचं नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे किणी, ता. हातकणंगले इथं मे.सम्राट फुडस नावाचे रेस्टॉरंट आहे. दि.१५ मार्च २०२४ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती किर्ती देशमुख यांनी तक्रारदार यांच्या रेस्टॉरंट वर तपासणी करून अन्न पदार्थांचे नमुने घेतले होते. देशमुख यांनी रेस्टॉरंट कोणतीही कारवाई न करणेसाठी तक्रारदार यांच्याक्डून १,००,०००/-रू.ची मागणी करून तडजोडीअंती ७०,०००/- रुपये लाच द्यायचं ठरलं. त्यापैकी २५,०००/-रू. लाचेचा पहीला हफ्ता आज राहत्या घराच्या पार्किंगमध्ये स्वतः स्विकारताना देशमुख यांना रंगेहात पकडण्यात आले.त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला,देशमुख यांना शनिवारी कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर देशमुख यांच्या घराची झडती घेण्यात आली. यामुळे ८० तोळे सोने, साडेतीन लाखांची रोख रक्कम, डायमंडच हार व किमती चार चाकी वहान सापडले आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस उपनिरीक्षक बंबरगेकर, सहाकार्यालयात भंडारे, पोलिस हवालदार सुधीर पाटील, पूनम पाटील यांच्या पथकाने ,सदरची  कारवाई केली. सदरच्या कारवाई मुळे F&D कार्यालयात दबक्या आवाजात , चर्चा चालू होती.

Post a Comment

0 Comments