त्रिदल सैनिक सेवा संघ खडकवासला,पुणे तर्फे कै शामराव श्रीपती बराटे विद्यालयात शहीद दिवस कार्यक्रमाचे आयोजन
शनिवार दिनांक २३ मार्च २०२४ रोजी त्रिदल सैनिक सेवा संघा तर्फे कै शामराव श्रीपती बराटे महाविद्यालयात शहीद दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात त्रिदल सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष मा मधुकर नाना पायगुडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमात आजी माजी सैनिक व त्यांचे परिवार, वीर नारी, वीर माता, वीर पिता, ग्रामस्थ, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक गण तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबाचा, वीर नारी, वीर माता पिता तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मान्यवरांचे मनोगत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ले कर्नल साहेबराव शेळके ( निवृत्त) आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की शहीद वीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपणास स्वातंत्र्य मिळवून दिले, आता ते सांभाळायची जबाबदारी आपण सर्वांची आहे. समाजाचे संतुलन राखण्यासाठी आदर्श विध्यार्थी व आदर्श नागरिक घडविण्याची जबाबदारी आपण पार पडावी असें आवाहन केले.
श्री बाळासाहेब लक्ष्मण नवले साहेबांनी आभार प्रदर्शन तर श्री नवनाथ नलावडे साहेबांनी उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केले.
शेवटी सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून शहीद वीरांना आदरांजली वाहिली.
____________________
____________________
____________________





Post a Comment
0 Comments