Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नाने रुई येथील अब्दुलमलिक दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटिकरणासाठी 50 लाखांचा निधीला लवकंरच मंंजूरी मिळणार.

 


जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळाली प्रशासकीय मान्यता : वर्कऑर्डरचे काम अंतिम टप्प्यात : फेब्रुवारीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार.

   हातकणगंले : दि-17 जानेवारी.सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2023 - 2024 अंतर्गत पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सुविधाकरिता अनुदान योजनेमधून रुईचे ग्रामदैवत हजरत अब्दुलमलिक दर्ग्याकडे जाणाऱ्या पंचगंगा नदीकडील रस्त्याच्या काँक्रिटिकरणासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. खासदार श्री.धैर्यशील माने  यांच्या विशेष प्रयत्नाने हा निधी मंजूर झाला असून वर्कऑर्डरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंजूर निधीतून अब्दुलमलिक दर्गा ते परीट यांच्या शेतापर्यंत काँक्रिटिकरण होणार आहे.

Post a Comment

0 Comments