राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात निरोधचा मोठा तुटवडा.
जोखजोखमीचे गट आत्ता आणखी जोखीम उचलणार...? एचआयव्ही एड्स नियंत्रणात कसा येणार?मीचे गट आत्ता आणखी जोखीम उचलणार...? एचआयव्ही एड्स नियंत्रणात कसा येणार?
कोल्हापूर, दीं. १६ -
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून
निरोधचा अर्थात कंडोमचा मोठा तुटवडा जाणवत आहे. एचआयव्ही बरोबर गुप्त रोग प्रतिबंधासाठी आणि
नियंत्रणासाठी महत्वाचे साधन ठरत असताना याचा जाणवणारा तुटवडा एचआयव्ही संसर्ग वाढीला निमंत्रण देणारा ठरला आहे.
महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी कडून जिला एड्स नियंत्रण सोसायटी यांना या निरोधाचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे एचआयव्ही एड्स नियंत्रण कसे करावे असा प्रश्न या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटना यांच्या समोर निर्माण झाला असून जोखमीच्या गट असुरक्षित घटक बनला आहे.दरम्यान कोल्हापूरमधील समाजमन संस्था यांनी जिल्ह्याला योग्य त्या प्रमाणात निरोधचा पुरवठा करावा, अशी मागणी केली असून याबदल महारष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी चे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती समाजमन सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष महेश गंगाराम गावडे यांनी दिली आहे
कोल्हापूर जिल्ह्याला एका महिन्यात सुमारे पन्नास हजार निरोधाचे वाटप करण्यात येते. हे वाटप प्रामुख्याने सीपीआर, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामधून संबंधितांना केली जाते. हे निरोध मोफत वाटण्यात येतात. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जिल्यात याचा पुरवठा होऊ शकलेला नाही. याबाबत विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी कडून जिला एड्स नियंत्रण सोसायटी यांना या निरोधाचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
एचआयव्ही नियंत्रण साठी निरोध हा असुरक्षित
शारारिक संबंध यांच्या पासून निर्माण होणाऱ्या गुप्त रोग आणि एचआयव्ही संसर्ग यापासून संबंधितांचा बचाव करतो. असे सांगितले जाते. मात्र हेच साधन जिल्ह्यात उपलब्ध नसल्यामुळे याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात कागल, हातकणंगले, शिरोळ, करवीर, चंदगड तालुक्याचा काही भाग यामध्ये एचआयव्ही चे प्रमाण सर्वाधिक आहे. एचआयव्ही नियंत्रणात येत आहे असे वाटत असतानाच गेल्या काही महिन्यांपासून निरोध चा जाणवणारा तुडवडा एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमच्या उद्देशाला कुठेतरी छेद देत आहे. त्यामुळे जोखमीचा गट निरोध शिवाय जोखीम पत्करून संबंध टेऊ लागल्यास एचआयव्ही चा टक्का पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.तसेच हेपाटायटीस बी आणि सी चे प्रमाण वादू शकते, अशी भीती या विषयातील जाणकार व्यक्त करत आहेत
दरम्यान मेडिकल मध्ये मिळणारे निरोध हे महागडे असतात. असे निरोध जोखमीचा गट क्वचितच वापरतात. तर शासनाकडून मिळणारे मोफत असतात.आता हेच निरोध यांचा तुटवडा भासू लागल्याने एचआयव्ही प्रतिबंध याला मर्यादा येऊ लागली असून या क्षेत्रातील संस्था, संघटना यांनाही जनजागृती मध्ये अडथळा निर्माण होत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
महेश गंगाराम गावडे
पत्रकार तथा समाजमन सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष.
कोल्हापूर. ९८२३७६७८५८
९८३४९८९५१९

Post a Comment
0 Comments