हातकणंगले:रुई दि 10 नोव्हेंबर23. रुई येथील हनुमान मंदिर मध्ये दिव्यांगाना दिवाळी निमित्त किट वाटप करण्यात आले, यामध्ये रुई गावातील तसेच आसपासचे गावातील 490 किट दिव्यांगाना वाटप करण्यात आले. यावेळी गावातील दिव्यांग बंधू-भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास हजर होते.हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी दिव्यांग महिला आघाडीच्या तालुका, हातकणंगले संगीता घोरपडे यांनी आयोजित केला होता दिव्यांग ना एक मदतीचा हात म्हणून सामाजिक उपक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री अशोकराव माने होते,त्यांचे स्वागत करून त्यांच्या हस्ते दिव्यांगांना किट वाटप करण्यात आली, तसेच अध्यक्ष सुहास राजमाने , सुरज संदी,धोंडीराम कांबळे ,बहुजन क्रांती दल दिव्यांग आघाडी सांगाव जिल्हा उपाध्यक्ष, विवेक पाटील ,जमीर मणकापूरे, शांतिनाथ हुपरे ,शांतिनाथ कनिरे संजय चौगुले दिव्यांग आघाडी जयसिंगपूर ,संजय जाधव इत्यादी मान्यवर दिव्यांग बंधू, ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments