मध्य रेल्वे, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर आणि पुणे दरम्यान ११४ दैनंदिन विशेष रेल्वे फेऱ्या चालवणार..
कोल्हापूर:सुत्रांनी दिलेल्या माहीतीनूसार
०१०२४ स्पेशल-
दि. ५.११.२०२३ ते ३१.१२.२०२३ (५७ फेऱ्या) पर्यंत दररोज २३.३० वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०७.४५ वाजता पोहोचेल.
०१०२३ स्पेशल-
पुणे येथून दि. ६.११.२०२३ ते १.१.२०२४ (५७ फेऱ्या) दररोज २१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शाहूमहाराज टर्मिनस कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी ०५.४० वाजता पोहोचेल.
येथे थांबणार:
कोल्हापूर, वळिवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज जंक्शन, सांगली, भिलावडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, वाठार, लोणंद, निरा, जेजुरी आणि सासवड रोड, पुणे.
संरचना: एकूण १६ ICF डब्बे.
१ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण: २९/१०/२३ पासुन सुरू झाले.

Post a Comment
0 Comments