Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांचा कोल्हापूर सभे साठी जयत तयारी.मंत्री हसन्न मुश्रीफ


 मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली तपोवनची पाहणी 

मंडप, सुरक्षा व्यवस्था, बैठक व्यवस्था व  वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाचा आढावा 

कोल्हापूर, दि. ४

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांचा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने "सत्कार आणि उत्तरदायित्व सभा" रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी कोल्हापुरात होणार आहे. पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री व खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी चार वाजता तपोवन मैदानावर होणाऱ्या या सभेला एक लाखाहून अधिक उपस्थित जमविण्याचा संयोजकांचा संकल्प आहे. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींनी तपोवन मैदानाची पाहणी केली. एक लाखावर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे.

       स्थायी समितीची माजी सभापती राजेश लाटकर म्हणाले, या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल,  वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, औषध व प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर या प्रमुखांसह राज्यभरातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

   

या प्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास, विनायक फाळके, उत्तम कोराने, महेश सावंत, सचिन पाटील, संदीप कवाळे, प्रकाश गवंडी, सुनील पाटील, सतीश लोळगे, प्रकाश रेडेकर, युवराज साळोखे, महेंद्र चव्हाण, प्रसाद उगवे, निखिल कोराने, श्रीमती रेखा आवळे, सीमा भोसले, पूजा साळोखे, संजय कुराडे, आसिफ फरास आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

____________________


_____________________

Post a Comment

0 Comments