सर्व सामान्य नागरिकांना, कार्यालयीन अधिकारी व कर्मचार्यांना यांना माहिती चा अधिकार जण जागृती मोहिम, याच हेतूने हातकणंगले तहसील कार्यालयत साजरा करण्यत आला.
स्वतंत्र माहिती अधिकार यशदा प्रविण प्रशिक्षक श्री व्यकते शाईन शेख यांनी सर्व माहिती अधिकार संबंधी सखोल माहिती दिली व जागृती केले. शासकीय कर्मचारी याच्यांवर दब दब रहवा म्हणून काही ठग माहीती मागवत आसतात. काही माहिती देण्यास टाळाटाळ करणारे, माहिती कशी द्यावी, त्याला नियम काय आहेत, माहिती कोणत्या उद्देशाने मागविले आहेत त्यात जण हिता बदल आहे काय? केवळ त्रास देणे हा उद्देश आहे का?यावरून अधिकारी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देखील करू शक्तो, कोणते कायद्याने कोणते कलम आहे, सामन्य नागरिकांना किती दिवसानी माहिती दिली पाहिजे याची हि माहित दिली.
हातकणंगले माहिती मिळवून व्यापक जनहित साध्य होणे, म्हणजे माहिती अधिकार कायदा सफल होणे होय. प्रशासन स्वच्छ व गतिमान करण्याचा उद्देश सफल करायचा असेल तर, जनहितार्थ सामूहिक दबाव निर्माण करा. परंतु, कर्मचाऱ्यांना धाक दाखवू नका. असे आवाहन माहिती अधिकार व्याख्याते शेख यांनी केले.
जागतिक माहिती अधिकार दिन हा 28 सप्टेंबर रोजी साजरा होत आसतो,त्या निमित्त हातकणंगले तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार कल्पना ढवळे/भंडारे होते.
शासन निर्णयानुसार आयोजित आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून माहिती अधिकार दिनानिमित्त श्री.शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट 2021 संदर्भातील रुग्ण हक्क सनद माहितीचे वितरण करण्यात आले. यावेळी. सार्वजनिक बांधकामचे शिवाजी पाटील, सहकारी संस्थेचे आशुतोष जाधव ,मुद्रांक अधिकारी दिलीप काळे
अन्नधान्य तालुका पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे.
ईत्यादी विभागाचे अधिकारी व पत्रकार योगेश पांडव, जिल्हा संघटक मच्छिंद्र कांबळे रूई मा. डेप्युटी सरपंच सुभाष चौगुले, रोहन साजने, अल्ताफ खतीब ,उषा हजारे, सुशीला बघेल आदि माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते.
,



Post a Comment
0 Comments