Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

चोरटयांनी साडेसोळा लाख युनिटी मोटर्स मधून केले लंपास


कोल्हापूर :गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्सचे बंध शोरुम रात्री अज्ञाताने फोडले.

गोकुळ शिरगाव येथे असलेले युनिटी मोटर्सचे शोरुम  रात्री बंद झाल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे सोळा ते साडे सोळा लाख रुपये इतकी रोकड पळवली. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी शोरुमचा दरवाजा उचकटून  काम फते केले. सदर प्रकरणी कंपणीचे मॅनेजर श्री. इरफान गवंडी यांनी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी व स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटना स्थळी भेट देउन पुढील तपास चालू आहे..

Post a Comment

0 Comments