Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

शालेय शिक्षण विभागाच्या विविध विषयांची सविस्तर आढावा संपन्न...

शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई.

मंत्रालय, मुंबई । २ जून २०२६

शालेय शिक्षण विभागाच्या विविध विषयांची सविस्तर आढावा संपन्न...

**राज्यातील शासकीय शाळांचा दर्जा अधिक उंचावून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन आज मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत केले.

बैठकीतील उपस्थिती:

या बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, उपसचिव तुषार महाजन यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चर्चेचे प्रमुख मुद्दे

यावेळी आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर खालील विषयांवर सविस्तर आढावा घेण्यात आला:

* शाळा प्रवेशोत्सव

* विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण

* शाळांमधील मूलभूत सुविधा

* विद्यार्थी सुरक्षा

* शिक्षक भरती

* शिष्यवृत्ती परीक्षा

* विविध शैक्षणिक उपक्रम


**मार्गदर्शन आणि पुढील दिशा:**

बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, मागील वर्षी राज्यभर राबविण्यात आलेल्या शाळा  हि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षीही शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा. तसेच विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी दर्जेदार गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे.आशि सुचना देण्यात आली.

--------------------------------------------------------




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या