हळदी गांवात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला अवैध्य गुटखा, सुगंधी तंबाखु, पान मसाला विक्री करणारे इसमास पकडुन त्याचेकडुन ४७,८००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत
करवीर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई
प ०९/०६/२०२६
पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल सो यांनी कोल्हापूर जिल्हयातील अवैध्य व्यवसायाबाबत माहिती मिळुन कठोर कारवाई करुन अवैध्य व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सर्व पोलीस ठाणे अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. मा पोलीस अधीक्षक सो यांनी दिले सुचनाप्रमाणे करवीर पोलीस ठाणेचे पोलीसmनिरीक्षक रविंद्र कळमकर यांनी त्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदा यांना करवीर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन अवैध गुटखा विक्री करणारे इसमांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत करीत हळदी गावचे मुख्यचौकात पोहचले असता चौकातील भद्रकाली पान शॉपचे पाठीमागे असलेल्या पार्टीशनच्या खोलीत एक इसम प्लास्टिकच्या पोत्यातून लहान - लहान पुड्या विक्री करीत असल्याचे दिसलेने त्याचेवर छापा टाकला. सदर इसमनामे खंडेराव मनोहर नाईक, व.व. ४५, रा. श्री स्वामी समर्थ गल्ली, हळदी, ता. करवीर, जि. कोल्हापूर याचे पुढ्यात असले प्लॅस्टीकच्या दोन्ही पोत्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला अवैध्य गुटखा, सुगंधी तंबाखु, पान मसाला असा एकुण ४७,८००/- रुपयाचा माल दोन पंचासमक्ष जप्त करुन यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईकरीता करवीर पोलीस ठाणेस आणला. सदर इसमांवर करवीर पोलीस ठाणेस अवैध्य गुटखा, सुगंधी तंबाखु व पान मसाला विक्रीसाठी जवळ बाळगला म्हणुन त्याचेवर गुन्हा दाखल केला असुन त्यास मा. कोर्टात हजर केले असता त्याला दि. ११/०६/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक सुहास पोवार हे करीत आहेत
सदरची कारवाई ही कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल साो, अपर पोलीस अधीक्षक, अप्णासाहेब जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, मा. सुजितकुमार क्षीरसागर सो यांचे मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी पोलीस उप निरीक्षक नाथा गळवे, सुहास पोवार, पोलीस अंमलदार रणजित पाटील, सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, विजय तळसकर, सोमराज पाटील, अमोल चव्हाण, विजय पाटील, प्रकाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या