महाराष्ट्र पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर,
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,
मोका गुन्हयातुन जामीनावर असलेले आरोपी यांना पुन्हा खंडणी व दरोड्याच्या गुन्हयात जेरबंद
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची धडक कारवाई
मा.पोलीस अधीक्षक, श्री.महेंद्र पंडित साो यांनी शरीराविरुध्दच्या गंभीर गुन्हयातील व दाखल असलेल्या पाहिजे आरोपींना शोधुन त्यांचेवर कडक कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.
मा.पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करुन त्यांना गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ११२/२०२५ भा. न्या. सं. ११८ [१], ३५२, ३०८[३], ३१०[२], ३५१[२] सह शस्त्र अधि.१९५९ चे कलम ५, २७ प्रमाणे गंभीर दाखल गुन्हयातील आरोपी नामे १] विशाल उर्फ गोटया अविनाश लातुर वय. २५ धंदा मजुरी रा जगदाळे शाळेजवळ राजारामपुरी १४ वी गल्ली कोल्हापूर २] अजय उर्फ अज्या अविनाश माने वय ३० रा सदर बाजर व ३] विधीसंघर्षगस्त बालक नामे प्रेम वय १७ वर्षे हे मोका सारख्या गुन्हयातील असुन ते सध्या जामीनावर होते व त्यांची राजारामपुरी परिसरामध्ये फार मोठी दहशत आहे, त्यांचेवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाणेस खंडणी व दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झालेपासुन ते फरार होते. नमुद पथक हे आरोपीचा शोध घेत असताना पथकाचे अमंलदार वैभव पाटील यांना सदर गुन्हयातील आरोपी हे चाकण पुणे येथे असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली त्यानुसार सदर पथकाने चाकण पुणे येथे जावुन सापळा रचुन त्यांना ताब्यात घेतले त्यांनतर त्यांना पुढील कारवाई करीता गोकुळ शिरगाव पोलीस ठाणेस हजर केले.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित सो, मा. अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार वैभव पाटील, अरविंद पाटील, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील विशाल खराडे परशुराम गुजरे, गजानन गुरव, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, संतोष बरगे यांनी केली आहे.
-----------------------+++----------------------

Post a Comment
0 Comments