मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने प्रथम मर्दानी स्पोर्ट्स कोल्हापूर विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
दि 9 फेब.25 कोल्हापुरातील मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने प्रथम मर्दानी स्पोर्ट्स कोल्हापूर विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शस्त्र पूजन आणि शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ,आमदार अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण) याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेळाडूंनी सादर केलेली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके पाहुण सर्व अचंबित करणारी होती. प्राचीन युद्ध कला जपण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे नियमित आयोजन करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी रविकिरण गवळी, हेमंत साळोखे, संतोष खंदारे, विनोद कुंजीर, देवराज सोनवणे,विक्रांत सोनवणे, अक्षय सोनवणे यांच्यासह खेळाडू आणि प्रशिक्षक उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments